तोगरी शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

 


तोगरी शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


उदगीर: या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोगरी या शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती( इयत्ता पाचवी )परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.


गायत्री महेश अलीबादे, पटणे श्रुती अंतेश्वर, सौदागर माहीन दिलदार, संगेवार चैतन्य सचिन, गायकवाड श्रद्धा बालाजी हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. 


पात्र विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी श्रीमान भगवानराव फुलारी, शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमान शिंदाळकर, केंद्रप्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे, मुख्याध्यापक दापके एल .व्ही., शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडितराव म्हादा, उपाध्यक्ष महेश तेलंग यांनी अभिनंदन केले आहे.


यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दापके एल .व्ही.,वर्गशिक्षक कुंभार आर .जी., पाटील एस .बी., साळुंखे व्ही .एस., राम शेट्टी यु. एस., बिरादार एच .जी., धनुरे के .जी., आंबे नगरे एल .के. यांचे मार्गदर्शन लाभले.