राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लातूर जिल्हा सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर सोळुंके यांची निवड

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लातूर जिल्हा सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर सोळुंके यांची निवड


उदगीर [ प्रतिनिधी ] राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी ज्ञानेश्वर सोळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, रा.काँ.पा.चे लातूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांच्या शिफारशीवरून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष आशिष वाघमारे सोळुंके यांची निवड केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या विचारानुसार पुढील कालावधीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे तसेच पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्याची व पक्षाची ध्येय धोरणे विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी यांचे सहकार्य राहील असा विश्वास पक्षश्रेष्ठीने व्यक्त केला आहे.


त्यांच्या या निवडीबद्दल रा. काँ. पा. चे साक्रिय कार्यकर्ते शफी हाशमी, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष मुकेश भालेराव, कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा दीपालीताई औटे, अभिजीत औटे, अजय शेटकार, अजम पटेल, सोनू हाशमी,राम जाधव , प्रसाद माना, राहुल बिरादार, सिकंदर शेख, सचिन सोळुंके,अरविंद पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही