*राजस्थानातील ब्राह्मण पुजार्याच्या हत्येचा तपास सीबीआय मार्फत व्हावा* *ब्राह्मण समाजाच्या वतीने निलंगा उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन*

*राजस्थानातील ब्राह्मण पुजार्याच्या हत्येचा तपास सीबीआय मार्फत व्हावा*


*ब्राह्मण समाजाच्या वतीने निलंगा उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन*


निलंगा/प्रतिनिधी ः- राजस्थान राज्यात असलेल्या करौली जिल्ह्यातील सपोटरा तालुक्यात असलेल्या बुकना येथील ब्राह्मण पुजारी बाबुलाल वैष्णव याची जीवंत जाळून हत्या करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास आत्महत्या असल्याचे भासून दडपविण्याचा प्रयत्न होऊ लागलेला आहे. या घटनेमुळे केवळ राजस्थान मधीलच नव्हे तर संपुर्ण देशभरातील ब्राह्मण समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचा तपास निपक्षपणे व्हावा याकरीता सीबीआयच्या मार्फत तपास करण्यात यावा अशी मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीने निलंगा येथील उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन करण्यात आलेली आहे.राजस्थान राज्यात असलेल्या करौली जिल्ह्यातील सपोटरा तालुक्यात असलेल्या बुकना येथील ब्राह्मण पुजारी बाबुलाल वैष्णव याची जीवत जाळून हत्याचा करण्यात आलेली आहे. सदर हत्या मंदिराची जमीन हडपण्याच्या उद्देशाने अत्यंत निघृणपणे करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारच्या वतीने अत्यंत दिरंगाईने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरण दडपविण्यासाठी ही आत्महत्या भासविण्यासाठी चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. या हत्याने राजस्थान सह देशभरताील ब्राह्मण समाजात रोष व्यक्त होत आहे. सदर प्रकरणाची तपासणी निपक्ष होण्याची मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीने होऊ लागली आहे. सदर मागणीसाठी निलंगा येथील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये ब्राह्मण समाजावर जातीय द्वेषातून सातत्याने अपमानजनक व जातीवाचक टिका-टिपन्नी होऊ लागलेली आहे. त्याचबरोबर समाजातील अनेकांना या टिका-टिपन्नीतील शाररीक व मानसिक अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आलेले आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या संरक्षणासाठी अॅट्रासिटी कायद्यात तरतुद करून ब्राह्मण समाजाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करून याबाबत संबंधीत यंत्रणेने समाजाच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करावा आणि समाजाची ही बाब शासनापर्यंत पोहचवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदर निवेदनावर अॅड अनंतराव सबनिस,माधवाचार्य पिंपळे, अविनाश धोडदेंव, प्रल्हाद पाटील,संजय पिंपळे, अॅड. प्रसाद पिंपळे, अॅड. जयंत देशपांडेअनिकेत सबनीस, अनिकेत कुलकर्णी,विश्र्वास नाईक, अण्णाराव सबनीस, श्रीपाद पिंपळे, प्रमोद मुनी, संजय नाईक, गजानन वाघ, निळकंठ निटूरकर, घनश्याम देशपांडे, अर्थव कुलकर्णी, अॅड.सतिष सबनीस, श्रीपाद कुलकर्णी,मुकुंद कुलकर्णी ,उपेद्र काशीकर, अनिकेत कुलकर्णी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.