*जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या हस्ते होमआयसोलेशन रुग्णांना किट वाटप व कोरोना योद्ध्यांचा सत्कार*

*जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या हस्ते होमआयसोलेशन रुग्णांना किट वाटप व कोरोना योद्ध्यांचा सत्कार*


 


*युनिसेफ व स्वयं शिक्षण प्रयोग स्वयंसेवी संस्थेमार्फत कोविड मध्ये काम करणाऱ्यांसाठी प्रत्येकी एक लाख साबण व मास्कची उपलब्धता*


 


*राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन*


 


 


लातूर, दि.2:- जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत लातूर एमआयडीसी मधील शासकीय मुला-मुलींच्या वस्तीगृहाचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करून कोविड बाधित रुग्णावर उपचार केले जात आहेत. आज येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते गृह विलगीकरण होणाऱ्या 25 रुग्णांना किटचे वाटप व या सेंटर मधील कोरोना वॉरियर्सचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.


      यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, नवनियुक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एल.एस.देशमुख, तत्कालीन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.संजय ढगे, लातूर तालुका आरोग्य अधिकारी अशोक सारडा, तहसीलदार स्वप्निल पवार, गट विकास अधिकारी शाम गोडभरले, भोजने टी.बी. श्रीमती चौधरी वर्षा कॅम्प ऑफिसर,कोविड केअर सेंटर एमआयडीसी लातूर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधव शिंदे, स्वयं शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हा समन्वयक म्हणुन राजाभाऊ जाधव उपस्थित होते.


       युनिसेफ व लातूर जिल्ह्यातील स्वयं प्रशिक्षण प्रयोग या स्वयंसेवी संस्थेमार्फत कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांसाठी व कोरोना रुग्णावर उपचार करणे डॉक्टर नर्स साफसफाई कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येकी एक लाख साबण व मास्क तसेच महिला रुग्ण व कर्मचाऱ्यांसाठी पुनर्वापर करता येणारे सॅनिटरी पॅड कोविड केअर सेंटर ला देण्यात आले. या सर्व वस्तू व होम आयसोलेशन किटचे वाटप जिल्हाधिकारी श्रीकांत व मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांच्या हस्ते कोविड केअर सेन्टर येथे झाले.


    या कार्यक्रमांचे औचित्य साधुन कोरोनाच्या आपत्तीमध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या या कोविड केअर सेंटर मधील डॉ.श्रीधर पाठक (वैद्यकिय अधिकारी,जि.श.कार्यालय लातूर) डॉ.सुनिता पाटील (वैद्यकिय अधिकारी),डॉ.आयेशा खान (वैद्यकिय अधिकारी), श्री. ज्ञानेश्वर काळे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) श्रीम.तुळजापुरे सुनंदा (परिचारिका) श्री.कांबळे एस.एस.(कॅम्प ऑफिसर) श्री. भोजने टी.बी.(कॅम्प ऑफिसर) श्रीम.चौधरी वर्षा (कॅम्प ऑफिसर) यांना " कोविड योध्दा " सन्मानपत्र जिल्हाधिकारी जी.श्रीकांत व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. 


     याकोविड केअर सेंटर मधील 25 रुग्णांना गृह विलगीकरण मध्ये ठेवण्यात येणार आहे त्या रुग्णांना आरोग्य विभागाच्या वतीने सुरक्षा किट देण्यात आले. तसेच होम आयसोलेशन बद्दल सविस्तर माहिती असलेली गृह विलगिकरण(होम आयसोलेशन) ही मार्गदर्शक पुस्तिका देण्यात आली. या पुस्तिकेत रुग्णांनी गृह विलगिकरनात कोणती काळजी घ्यावी. काय करावे व काय करू नये याची माहिती. तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागातील सर्व महत्त्वांच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेच कोविडवर उपचार करणारे सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयाची माहिती व सम्पर्क क्रमांक तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत घ्यावयाची काळजी आदि माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली आहे. 


* प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.*


  या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.श्रीधर पाठक यांनी केले तर आभार डॉ.माधव शिंदे यांनी मानले.


        *******