मी संकल्प केला आहे ... तुम्ही पण आवश्य करा: राहुल केंद्रे                   

मी संकल्प केला आहे ... तुम्ही पण आवश्य करा: राहुल केंद्रे                                                                                                            


           समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडल (सक्षम) ही दिव्यांगांसाठी कार्यरत देशातील आग्रणी संस्था संस्थेच्या वतीने देशभर दिव्यांगांकरिता विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. 


     दृष्टीबाधीतांसाठी कॉर्निया अंधत्व मुक्त भारत अभियानाची सुरुवात दिल्ली येथून महामहिम उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू यांच्या शुभहस्ते करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. 21 सप्टेंबर 2020 ते 4 ऑक्टोबर 2020 या कालावधीत नेत्रदान करण्यासंबधी संकल्प पत्र ऑनलाईन भरण्याचा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. 


     सोबत लींक देत आहोत. सक्षम संस्थेचा हा उपक्रम दृष्टीबाधीतांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. दृष्टीबाधीतांची संख्या पाहता सध्या या उपक्रमाची आवश्यकता खूप आहे. आपल्यामुळे एखाद्याला दृष्टी देण्याचे इश्वरी कार्य आपल्या हातून या निमीत्ताने होणार आहे. भविष्यामध्ये कॉर्नियाचा तुटवडा भासू शकतो त्यादृष्टीने या संकल्पाची अत्यंत आवश्यकता आहे. 


    मी संकल्प केला आहे नेञदान करण्याचा.. तुम्ही पण आवश्य करा.......


             आपण, आपले कुटुंबिय, नातेवाईक, शाळेतील विद्यार्थी, नागरिक यांच्याकडून ऑनलाईन फॉर्म भरुन घ्यावेत --- *ज़िल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे* 


लिंक - https://caarya-saksham.web.app/eye-donation-campaign