देवणी येथे क्रीडा संकुल उभारावे
रायुकाँचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांचे राज्यमंत्री तटकरे यांना निवेदन
निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी या तालुक्याच्या ठिकाणी क्रिडा संकुलन मंजूर करावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांना दिले आहे. दरम्यान या मागणीनंतर राज्यमंत्री तटकरे यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हा क्रिडा अधिकायांना दिले आहेत.
देवणी या तालुक्याची निर्मिती होऊन वीस वर्षे होत आहेत. मात्र अद्यापही या तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलनाची सोय नाही. या मुळे ग्रामीण भागातील खेळाडूंची गैरसोय होत आहे. ही गैरसोय लक्षात घेवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी राज्याच्या क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेवून तालुका क्रीडांगण करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांच्या निवेदनाची दखल घेवून राज्यमंत्र्यांनी लातूरच्या जिल्हा क्रीडा अधिकायांना यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूरज चव्हाण यांनी दिली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा