*औरादच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरच मार्गी लागणार: आरोग्य मंत्री राजेश टोंपे यांनी दिले आदेश राष्ट्रवादी युवक चे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रयत्नाना यश...

*औरादच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरच मार्गी लागणार:


आरोग्य मंत्री राजेश टोंपे यांनी दिले आदेश


राष्ट्रवादी युवक चे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रयत्नाना यश...


औराद (शहाजनी) येथील ग्रामीण रुग्णालयाचे निधी अभावी अडगळीत पडलेले काम व कर्मचारी यांची कमतरता यामुळे इमारत वापरामुळे राहिली असुन त्या करिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आरोग्यमंत्री राजेश टोंपे यांच्या कडे पाठपुरावा केला व त्यांनी रुग्णालय निधी उपलब्ध करुन चालू करण्याचे व करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले. यामुळे मागील २ वर्षापासून ची औरादकरांची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येईल. 


यावेळी अौराद (श)येथे अवकाळी पावसाचा पाहणी दौरा ही सुरज चव्हाण यांनी केला व शेतकरी वर्गास नुकसान भरपाई साठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. 


*अंबुलगा (मेन) येथील रुग्णालयासही मिळणार नविन अॅंब्युलन्स: सुरज चव्हाण यांनी सरपंच सुभाष शिंदे यांना दिली ग्वाही*


अंबुलगा (मेन) येथे राष्ट्रवादी चे युवा नेतृत्व आमदार रोहीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार विचार मंच निलंगा युवक चे कार्याध्यक्ष यांनी फळवाटपाचा कार्यक्रम केला. यावेळी राष्ट्रवादी युवक चे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण कार्याध्यक्ष उपस्थित होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी पाणीपुरवठा व प्राथमिक आरोग्य केंद्र अंबुलगा येथे अॅंब्युलन्स व इतर सुविधा ही पाठपुरावा करुन पुर्ण करण्याचे आश्वासन सुरज चव्हाण यांनी दिले. 


यावेळी सरपंच सुभाष शिंदे, शरद पवार विचार मंच चे तालुका अध्यक्ष सुधीर मसलगे, कार्याध्यक्ष अंगद जाधव, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव शिंदे, संदिप मोरे, किसन पाटिल, राहुल झरे, कुनाल सगर, शरद पवार विचार मंच चे युवक तालुका अध्यक्ष सचिन चव्हाण, सुग्रीव सुर्यवंशी उपस्थित होते. युवक कार्याध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी आभार मानले.


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
' त्या' उदगीरला आल्या, महिलांशी संवाद साधला अन महिलांची मने जिंकून गेल्या....
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*चिमुकल्यांसाठी ना.संजय बनसोडे यांची सायकलस्वारी*
इमेज