फळबाग लागवड योजनेमध्ये  सहभागी होण्याचे आवाहन

फळबाग लागवड योजनेमध्ये 


सहभागी होण्याचे आवाहन


 


 लातूर, :-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तीक लाभार्थ्याच्या शेतावर कृषि विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे .जिल्हयातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी सदर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालाशी संपर्क साधावा. फळबगा लागवड कार्यक्रमासाठी लाभाथ्याचे नावे असलेले मग्रारोहयो योजनेचे जॉबकार्ड, शेतीचा 7/12 व 8 अ, आधारकार्ड , राष्ट्रीयकृत बॅकेचे पासबुक ई कागदपत्राची अवयश्कता आहे.


 या योजनेमध्ये प्रामुख्याने आंबा कलम , आंबा रोपे , चिकु , पेरु , डाळींब, मासेबी, संत्री, लिंबु ई पिकाचा समावेश आहे.सदर योजनेमध्ये पात्र लाभार्थी म्हणुन अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, दारीद्रय रेषेखालील लाभार्थी , भुसुधार योजनेचे लाभार्थी , इंदीरा आवास योजनेचे लाभार्थी , कृषि कर्जमाफी योजना 2008 नुसार अल्प भुधारक व सिमांत शेतकरी,अनुसुचीत जातीच्या व अन्य पंरपरागत वन निवासी अधिनियम 2006 नुसार पात्र लाभार्थी सहभागी होऊ शकतात .


  शेतकऱ्यानी आपले कार्यक्षेत्रामधील कृषि सहाय्यक , कृषि पर्यावेक्षक , मंडळ कृषि अधिकारी तसचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून फळबाग लागवड योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केले आहे.


 


 


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज