लिंगायत आरक्षणासाठी महासंघाचे जिल्हाधिकार्‍यांसह सर्व तहसीलदारांना निवेदन सादर

लिंगायत आरक्षणासाठी महासंघाचे जिल्हाधिकार्‍यांसह सर्व तहसीलदारांना निवेदन सादर


लातूर ः लिंगायत महासंघ लातूर जिल्ह्याच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली सरसकट लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकार्‍यांना व उदगीर, अहमदपूर, निलंगा येथील उपजिल्हाधिकार्‍यांना व सर्व तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 


महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला लिंगायत, हिंदु लिंगायत, वाणी, वीरशैव या नावाने बोलले जाते व तशीच आमच्या कागदपत्रावर नोंदीही आहेत. वाणी व लिंगायत वाणी नावाला ओबीसीचे आरक्षण आहे. वाणी, लिंगायत वाणी असा जोडशब्द केल्यामुळे लिंगायतांना आरक्षण मिळत नाही. त्यापेक्षा लिंगायत, वाणी एवढीशी दुरूस्ती केली किंवा लिंगायत, हिंदु लिंगायत, वीरशैव वाणी या एकाच जातीची नावे आहेत असे समजून नवे शुध्दीपत्रक काढल्यास त्याच्या लाभ महाराष्ट्रातील लाखो लिंगायतांना होईल. 


ज्यांच्या कागदपत्रावर लिंगायत, हिंदु लिंगायत व वीरशैव आहे यांना वाणी नावाला लागू असलेले आरक्षण मिळत नाही. तसेच या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी महसुली, जुने पुरावेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे कागदी मेळ, शब्द खेळाच्या जाळ्यात लिंगायत आरक्षण आडकले आहे. आज लिंगायत महासंघाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यामार्फत मुख्यमंत्र्यांना वरिल मागणीचे निवेदन देण्यात आले व हा प्रश्‍न लवकरात लवकर सुटावा अशी विनंती करण्यात आली. 


हे निवेदन देतांना लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्यासह कावळे तुकाराम गोविंदराव, जयराज चंद्रकांत बेलुरे, कोकणे एम.एम., विश्‍वनाथ मिटकरी, ब्रह्मवाले जी.जी., माणिकप्पा मरळे, तानाजी पाटील भडीकर, विश्‍वनाथ स्वामी साबळे, बिराजदार वैजनाथ, विजयकुमार कुडूंबले, रमेश वेरूळे, सुर्यकांत तुकाराम थोटे आदिंची यावेळी उपस्थिती होती. 


Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image