केंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे दिशा समितीचे निर्देश*

केंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे


दिशा समितीचे निर्देश*


लातूर :- जिल्ह्यातील सर्वसामान्य लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी केंद्रीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ने सर्व संबंधित विभाग प्रमुखांना दिले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी राष्ट्रीय महामार्गाची कामे दर्जेदार व्हावीत असे निर्देश दिले. तर आजची दिशा समितीची बैठक खासदार सुधाकर शृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांना तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश त्यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यलयाच्या नवीन सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण(दिशा) समितीची बैठक खासदार सुधाकर शृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, आमदार सर्वश्री संभाजी पाटील निलंगेकर, बाबासाहेब पाटील, अभिमन्यू पवार, धिरज देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, प्रकल्प संचालक संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई व सर्व समिती सदस्य व विभाग प्रमुख उपस्थित होते.


खासदार शृंगारे पुढे म्हणाले की जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन जास्तीत जास्त मजूरांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. तसेच जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व राष्ट्रीय महामार्गाची कामे अधिक गतिमान पद्धतीने करून ती दर्जेदार झाली पाहिजेत यासाठी अधिक लक्ष द्यावे असेही त्यांनी सूचित केले.


कोविड-19 च्या अनुषंगाने जिल्ह्यात माझे कुटुंबाची जबाबदारी ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविली तसेच या मोहिमेविषयी सर्वसामान्य नागरिक का मध्ये प्रबोधन करावे अशी सूचना खासदार शृंगारे यांनी केली तसेच प्रधानमंत्री आवास योजनेची जिल्ह्यात शंभर टक्के कामे पूर्ण झाली पाहिजेत. त्याप्रमाणेच केंद्रीय योजनांचे अंमलबजावणी करताना त्या-त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना त्याची माहिती दिली गेली पाहिजे. राजशिष्टाचार पाळला गेला पाहिजे. तसेच लोकप्रतिनिधी कामा विषयीच्या ज्या काही सूचना असतील त्यास तात्काळ प्रतिसाद दिला गेला पाहिजे असेही त्यांनी सुचित केले.


या वर्षीच्या पर्यावरण दिनानिमित्त लातूर जिल्ह्यात बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षलागवड करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून त्याबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे हाती घ्यावी अशी सुचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली. नरेगा अंतर्गत शक्य तेवढी कामे विभागाने प्रस्तावित करावीत व त्या त्या भागातील लोकांना काम उपलब्ध करुन द्यावीत असेही त्यांनी सूचित केले. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे कामे गुणवत्तापूर्ण व पारदर्शकपणे पूर्ण करावीत तसेच बोरगाव ते नांदेड बॉर्डर रस्त्याचे कामाची पाहणी संबंधित अधिकाऱ्याने करण्याची सूचना श्री बनसोडे यांनी केली.


यावेळी माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार धिरज देशमुख, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यु पवार यांनी नरेगा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पालकमंत्री पाणंद रस्त्यासाठी नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करणे, महावितरण, शेतकऱ्यांना सिंचनासाठी नियमित वीज पुरवठा, रोहित्र दुरुस्ती तात्काळ करणे, कृषी सिंचन योजना, सौर ऊर्जा, राष्ट्रीय महामार्गाची कामे, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या विभागांच्या कामाबाबत समस्या मांडून त्यावर संबंधित विभागांनी तात्काळ कारवाई करावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा असे निर्देश बैठकीत दिले.


या बैठकीस ज्या विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. तसेच बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना बाबत अनुपालन अहवाल पूर्ण करून घेण्याची जबाबदारी प्रकल्प संचालक यांची असून पुढील बैठकीपासून त्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले. 


ऑनलाइन शिक्षण व शाळा कडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शाळांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क घ्यावे अथवा घेऊ नये याबाबत स्पष्ट सूचना शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेऊन त्याबाबतची माहिती तात्काळ जिल्ह्यातील नागरिकांना द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले. महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत जिल्ह्यात तालुकानिहाय कामांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी दिली.


प्रारंभी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान व कोविड आजाराने मृत्यू पावलेल्या सर्वांसाठी दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दिशा समितीच्यावतीने कोरोना आजाराच्या काळात आरोग्य विभागाने बजावलेल्या भूमिकेबद्दल कौतुक करण्यात आले. तसेच यावेळी सर्व संबंधित विभाग प्रमुख यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात आलेल्या केंद्रीय योजनांची माहिती दिशा समिती पुढे पावर पॉइंट द्वारे सादर करण्यात आली. या सभेचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी मानले.


 


 


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image