आमदारांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी मुक्तसंवाद --- धिरज देशमुख यांचा पुढाकार; वांजरखेडा जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट

आमदारांनी साधला


शालेय विद्यार्थ्यांशी मुक्तसंवाद


---


धिरज देशमुख यांचा पुढाकार; वांजरखेडा जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट


---


लातूर : दररोज शाळा भरणे चांगले की ऑनलाईन क्लास... घरात रहावे लागत असल्याने मित्र-मैत्रिणींची आठवण येते का... तुम्ही घरात मोकळा वेळ कशा पद्धतीने घालवता... असे विविध प्रश्न विचारत आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी शालेय विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही त्यांना तितकीच मनमोकळी उत्तरे दिली. आणि दोघांतील संवादाचा तास उत्तरोत्तर रंगत गेला. दरम्यान, विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संवाद घडवून आणण्यासाठी शाळांनी ऑनलाईन शिक्षणात एखादा तास खेळाचा ठेवावा, अशी सूचना आमदार धिरज देशमुख यांनी शाळांना केली.


 


कोरोना महामारीच्या संकटकाळातसुद्धा वांजरखेडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या शाळेला आमदार धिरज देशमुख यांनी गुरुवारी (ता. 8) सदिच्छा भेट दिली. ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कविता, गाणी, पुस्तकाबाहेरील प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामुळे गप्पांचा तास आणखी रंगत गेला अन् विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलत गेले.


 


आमदार धिरज देशमुख म्हणाले, कोरोनाच्या काळात शिक्षक विशेष प्रयत्न करून अनेक नवनवीन गोष्टी ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवत आहेत. हे कार्य अभिनंदनीय असेच आहे. कोरोना सध्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर शाळा सुरू होतील, अशी शक्यता आहे. पण, सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना एकमेकांशी भेटता-बोलता येत नाही. त्यामुळे शाळांनी ऑनलाईन शिक्षण देताना एखादा तास खेळांवर किंवा पाठ्यपुस्तकाबाहेरील विषयांवर आधारित ठेवावा. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकमेकांशी गप्पा मारण्याची संधी मिळेल. याचा सर्वच शाळांनी विचार करायला हवा.


 


वांजरखेड्याच्या शाळेचे उपक्रम हे एका शाळेचे उपक्रम न राहता इतर जिल्हा परिषदांच्या शाळांनी ते राबवायला हवेत, असेही धिरज देशमुख यांनी सांगितले. ऑनलाईन क्लाससाठी मुले पालकांचा मोबाईल वातरतात. त्यामुळे ही शाळा सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळात भरते. या कल्पनेचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी तहसीलदार स्वप्नील पवार, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, प्रकाश उफाडे, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, श्री. फुलारी, श्री. म्हेत्रे, श्री. माळी, श्री. स्वामी, श्री. कलशेट्टी, श्री. वाघमारे, श्री. माळाळे, श्री. राऊत, श्री. ब्याळे, श्रीमती रायवाडे, श्री. भिसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


-----


शाळांना ग्रेड द्यावी


कोरोना काळात वांजरखेडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांचे प्रयत्न आणि विद्यार्थ्यांची ज्ञान ग्रहण करण्याची धडपड पाहून मनापासून आनंद वाटला. शाळांच्या अशा शैक्षणिक कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने किंवा जिल्हा परिषदेने शाळांना ग्रेड द्यावी, अशी अपेक्षा आमदार धिरज देशमुख यांनी व्यक्त केली. मुलींच्या शिक्षणाची सोय गावातच व्हावी, त्यासाठी लागणारे सर्व सहाय्य करण्याचे आश्वासनसुद्धा त्यांनी दिले. शिक्षण स्थानिक पातळीवर झाले तर शिक्षणातील गळती कमी होईल व जिल्हा परिषदेच्या शाळेविषयी आपुलकी तयार होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधून घेतले.


---


 


पालकांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याला सोबत घेऊन एक झाड शाळेत तर एक झाड बांधावर लावून त्याचे संगोपन करावे. निसर्ग समतोल राखण्यात मोलाची भूमिका निभवावी.


- धिरज देशमुख, आमदार


----


 


 


 


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही