मादळे कुटुंबीयांचे राज्यमंत्री ना. बनसोडे यांच्याकडून सांत्वन
उदगीर: उदगीर येथील रहिवाशी सेवानिवृत्त तलाठी मारोतराव ग्यानोबा मादळे यांचे दि. २० सप्टेंबर रोजी निधन झाले होते. त्यानिमित्ताने आज दि. १० ऑक्टोबर रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी मादळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटूंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी कॉग्रेसचे तालुकाध्याक्ष कल्याण पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, पद्माकर उगिले, माजी जि. प सदस्य विनायक कांबळे, समिर शेख, प्रभुदास गायकवाड, बाबासाहेब सुर्यवंशी, धम्मानंद कांबळे, सतीश गायकवाड उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा