औरंगाबाद हैद्राबाद औरंगाबाद पॅसेंजर रेल्वे सुरू

औरंगाबाद हैद्राबाद औरंगाबाद पॅसेंजर रेल्वे सुरू


उदगीर रेल्वे संघर्ष समिती या प्रयत्नाला अंशतः यश


उदगीर: दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने औरंगाबाद हैदराबाद औरंगाबाद ची गाडी चालू करून परळी ते विकाराबाद रोड वरील प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तब्बल सात महिन्यानंतर उद्या तेवीस तारखे पासून ही पॅसेंजर सेवा सुरू होत आहे. याचे वेळ पूर्वीप्रमाणे असून सोळा डब्यांची गाडी राहणार आहे. परळी,लातूर रोड,उदगीर कमाल नगर, भालकी,बिदर, जहीराबाद, या मार्गावरील प्रवासी व व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.


रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोइजोडे यांनी तिरुपती जाणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी नांदेड बेंगळुरू ट्रेन त्वरित चालू करण्यासाठी पाठपुरावा चालू असल्याचे कळविले आहे.