ग्रंथालयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत- दिनेश पाटील

सर्वांगीण विकासासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत- दिनेश पाटील


लातूर : महाराष्ट्रातील तमाम शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची सध्या प्रचंड गोची चालू असून कर्मचाऱ्यांना जगणे मुश्किल झाले आहे. एका बाजूला कोरोनाविषाणूच्या महामारी मुळे मार्च पासून ऑक्टोबर पर्यंत ग्रंथालय बंद होती. यादरम्यान कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणे अपेक्षित असताना त्यांना मूळ पगार देखील मिळाला नाही. तसेच ग्रंथ खरेदीच्या चालू वर्षात वेतनेतर खर्चासाठी मंजुरीही मिळालेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाने याकडे गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. असे विचार महाराष्ट्र ग्रंथालय सेना जिल्हा अध्यक्ष दिनेश पाटील यांनी यांनी व्यक्त केले.तशा


आशयाचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना तहसीलदार यांच्यामार्फत  दिले आहे. सदरील निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, मार्च 2020 पर्यंत थकीत अनुदान मंजूर केल्या बद्दल राज्यातील 12700 ग्रंथालय संस्थेचे एक लाख 22 हजार विश्वस्त व या ठिकाणी काम करणारे 22 हजार कर्मचारी यांच्या वतीने शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. देशात आणि राज्यातही कोरोना विषाणूची महाभारी चालू झाल्यापासून सर्व क्षेत्रात लाकडाऊन लागू झाला, त्यामुळे राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय शासनाच्या आदेशाने बंद ठेवण्यात आले. पाहता-पाहता सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. या कालावधीत केंद्र व राज्य शासनाने सर्व क्षेत्रातील कामगार, मजूर, उद्योजक, शेतमजूर, असंघटित कामगार, शासकीय व निमशासकीय कामगार, बँक कर्मचारी इतर गोरगरीब कुटुंबांना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात आर्थिक पॅकेज व इतर मदत देऊन जनतेस दिलासा दिला. या निर्णयाचे कौतुक व अभिनंदन या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून ग्रंथालय कर्मचारी नाममात्र मानधनावर काम करून उदरनिर्वाह भागवत आहेत. या बाबीकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने या कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्वरूपातली आर्थिक मदत मिळालेली नाही. लाॅकडाऊन मध्ये ग्रंथालय बंद असल्यामुळे ग्रंथालयांना होणारे उत्पन्न शून्य टक्के झाले आहे. परिणामत:  शासन निर्णय आकृतीबंध कर्मचारी संख्या व त्यांना ठरवून दिलेले मानधन संस्था प्रमुख यांना एकमुस्त देता आले नाही.  हे वेतन किंवा मानधन थोडे-थोडे करुन संस्था प्रमुखांनी दिले, पण या कर्मचारी बांधवांना वेळेवर न मिळाल्याने त्यांना त्याचा फारसा उपयोग झाला नाही. काही कर्मचारी ग्रंथालय वेळे व्यतिरिक्त अन्य व्यवस्थापनाकडे मजुरीला जाऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. परंतु लाॅकडावूनमध्ये हे मजुरीचे काम मिळणे देखील बंद झाले. त्यामुळे हा कर्मचारी वर्ग सर्व बाजूंनी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर काही कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांपैकी तीस ते चाळीस टक्के कर्मचाऱ्यांना या सद्यपरिस्थिती मध्ये वेगवेगळ्या समस्या सोबतच काहीजणांना कोरोणा पॉझिटिव्ह ची महामारीची लागण झाल्यामुळे यांना या वैद्यकीय सेवा घेण्यासाठी पैसे नसल्याने या पैकी दहा ते पंधरा टक्के कुटुंबीय सदस्य कर्मचारी यांचे दुःखद निधन झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून कर्मचारी बांधवांना शासनाने आर्थिक दिलासा देण्याची गरज आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात राज्यावर आलेल्या आर्थिक भार संघटना प्रमुखांनी व ग्रंथालय संस्थाचालकांनी विचार करून सरकारकडे नव्याने आर्थिक मागणी न मागता या कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचा पगार शासनाच्या परवानगीने वेतनेतर अनुदानात  दुप्पट वाढ करून द्यावी. अशी शिफारस या चळवळीच्या वतीने करण्यात आली असून असे झाल्यास कर्मचाऱ्यांना थोडाफार हातभार लागणार आहे. असेही नमूद करण्यात आले आहे. या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. अशी आग्रहाची मागणी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील यांनी केली आहे. सदरील निवेदनावर तालुकाप्रमुख राजाभाऊ सूर्यवंशी, तालुका उपप्रमुख प्रसाद शिरसे, दीपक मल्लिकार्जुन फुलारी भालके, पंचाक्षरी स्वामी,रामभाऊ बिराजदार, जनार्धन के एस, शिवकुमार बिराजदार, गोविंद पाटील, बाबुराव पाटील, दिगंबर पिंपळे, नरेंद्र देशपांडे, अंकुशराव कोणाळे, इब्राहिम सत्तार, सिद्धार्थ गायकवाड, चंद्रकांत टेंगेटोल, अरुण बिरादार, कैलास पाटील, शिवकांत चटनाळे, ब्रह्माजी केंद्रेआदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्याआहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी ग्रंथालय चळवळीला पाठबळ देणे गरजेचे आहे.असे समजून शिवसेना भाजपच्या काळात या चळवळीला गती देण्यासाठी मानधना मध्ये वाढ करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात सन 2012 पासून आजतागायत कोणत्याही स्वरूपाची वाढ झालेली नसल्याने सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांची मोठी गोची सुरू आहे. असेही विचार महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील यांनी व्यक्त केले आहेत. या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून शासनाने अत्यंत महत्त्वाच्या परंतु अपेक्षित असलेल्या ग्रंथालय विभागाच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. अशीही मागणी सदरील निवेदनात करण्यात आली आहे.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज