जिल्हयातील 5 हजार लोकसंख्येच्या प्रत्येक गावात ओपन जीमचे प्रस्ताव सादर करावेत -राज्यमंत्री संजय बनसोडे

 


जिल्हयातील 5 हजार लोकसंख्येच्या प्रत्येक गावात ओपन जीमचे प्रस्ताव सादर करावेत -राज्यमंत्री संजय बनसोडे


*उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व कामे संबंधित यंत्रणांनी त्वरीत मार्गी लावावेत


*उदगीर येथे सर्व क्रीडाविषयक सोयीसुविधांनी युक्त क्रीडा संकुल उभारणीचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा.


*उदगीर येथील प्रशासकीय इमारतीच्या सुधारित प्रस्तावाला 15 दिवसात तांत्रिक मान्यता मिळाली पाहीजे.


लातूर- क्रिडा विभागामार्फत ओपन जीम अनेक ठिकाणी सुरु आहेत. या जीमचा फायदा नागरिकांना चांगल्याप्रकारे होत आहे. तरी लातूर जिल्हयातील सर्व 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावात ओपन जीम सुरु करण्याठी क्रीडा विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. तसेच उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सर्व मंजूर असलेली व प्रलंबित राहिलेली कामे अधिक गतीने मार्गी लावातीत, असे निर्देश संसदीय कार्य, पर्यावरण, भूकंप पुर्नवसन, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम रोजगार हमी योजना, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हयातील व उदगीर विधानसभा मतदार संघातील प्रलंबित कामांच्या आढावा बैठकीत राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे,उदगीर न.प. चे मुख्याधिकारी भारत राठोड, उदगीर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कांडलेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, उदगीर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील यांच्या सह संबंधित जिल्हा व उदगीर –जळकोट तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.


राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, ओपन जीमचा नागरिकांना चांगला फायदा होत आहे. प्रत्येक शहरात किमान 10 तर 5 हजार लोकसंख्येच्या प्रत्येक गावात किमान एक ओपन जीम निर्माण करण्याचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व तरुणांना याचा लाभ मिळेल. त्याप्रमाणेच उदगीर येथे सर्व सोयी- सुविधा युक्त क्रीडा संकुल उभारणीचा बृहत आराखडा तात्काळ सादर करावा. या क्रीडा संकुलात बॅडमिंटन, रनिंग ट्रॅक, फुटबॉल ग्राऊंडसह इतर सर्व क्रिडा विषयक सुविधा प्रस्तावित कराव्यात असे त्यांनी निर्देशित केले.


तसेच उदगीर क्रीडा संकुलाची जी जागा आहे त्यास सर्व बाजूंनी कंपाऊंड वॉलचे काम तात्काळ सुरु करावे. जो 86 लाखाचा प्रस्ताव केला आहे त्यासाठी निधी कमतरता असेल तर आमदार फंडातून निधी उपलब्ध् केला जाईल, असे श्री. बनसोडे यांनी सांगितले. 


सार्वजनिक बांधकाम विभागाने उदगीर येथे सर्व शासकीय कार्यालयांसाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावास पुढील 15 दिवसात तांत्रीक मान्यता घ्यावी. ही इमारत भविष्यकालीन परिस्थितीचा विचार करुन अत्यंत प्रशस्त तयार केली पाहीजे असे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगून यासाठी 25 कोटीचा निधी मंजूरी लवकरच मिळेल असे त्यांनी म्हटले. तर उदगीर येथील ट्रॉमा केअर इमारत तांत्रीक मान्यता आली असून उर्वरित सर्व कामे त्वरित मार्गी लावातेत, असे त्यांनी सूचित करुन आरोग्य विभागाने यासाठी मंजूर पदांचा आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.


उदगीर शहरात उमा चौकात ट्रॅफिक जॅम मोठया प्रमाणावर होत आहे. त्यामुळे त्याठिकाणी उड्डाणपुलाचा प्रस्ताव त्वरित सादर करावेत. मार्केट यार्ड ते ,एम.जी. रस्ता, व मलकापूर उड्डाणपूल चे प्रस्ताव वेळेवर सादर करुन कामे तातडीने मार्गी लावावेत. ज्या ठिकाणी अडचणी येत असतील त्याची माहिती तात्काळ दयावी, असे श्री. बनसोडे यांनी सूचित केले.


उदगीर शहरात देगलूर रस्त्याच्या मध्यभागी जे वीजेचे खांब आलेले आहेत त्याचे वीज कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्वरीत सर्वेक्षण करुन ते रस्त्याच्या कडेला घेण्याचे अंदाजपत्रक त्वरित सादर करावे. न्यायालयीन इमारत, निवासस्थाने व सभागृहाची कामे ही त्वरित मार्गी लावावीत, असे निर्देश श्री. बनसोडे यांनी दिले.


जळकोट येथील शासकीय विश्रामगृह, मुलींचे वसतिगृह व शासकीय रुग्णालयाची कामे वेळेत पूर्ण करावीत. तर जळकोट तहसिलला जाण्यासाठी जोड रस्त्याचा प्रस्ताव नगर पालिकेने सादर करावा. त्याप्रमाणेच उदगीर येथे नव्याने एम.आय.डी.सी. 108 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित करण्यात आली असून हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. तरी संबंधित यंत्रणेने पाठपुरावा करावा, असे निर्देश श्री.बनसोडे यांनी दिले. उदगीर उपविभागीय पोलीस कार्यालय व उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनला शासकीय जागा उपलब्ध् करुन घ्यावी, असे ही त्यांनी सूचित केले.


जळकोट ला विशेष बाब म्हणून उपविभागीय वीज कार्यालयाचा प्रस्ताव तसेच उदगीर येथे अंबाजोगाई व अकलूजच्या धर्तीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय निर्माण करण्याचे प्रस्ताव त्वरित संबंधित विभागांनी सादर करावेत. तसेच दुग्ध् तंत्रज्ञान महाविद्यालय इमारतीचा 67 कोटीचा प्रस्ताव आहे. तरी प्रशासनाने दुध डेअरी व दुग्ध् तंत्रज्ञान महाविद्यालय संयुक्तपणे मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर चालविले जावे असा प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना श्री. बनसोडे यांनी केली.


यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत ,पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी ही मार्गदर्शन केले. तसेच दिलेल्या सूचनांवर तात्काळ कार्यवाही करुन प्रलंबित कामे मार्गी लावली जातील, असे सांगितले.


यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी लातूर जिल्हा विशेषत:उदगीर व जळकोट तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामे व पायाभुत सोयी-सुविधांचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. व दिलेल्या सूचनेप्रमाणे संबंधित यंत्रणेने दक्षता पूर्वक कामे पार पाडावीत ,असे ही त्यांनी सांगितले. 


 


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही