मतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन

मतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे


व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन


 


लातूर,- 234 लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघ व 235 लातूर शहर विधानसभा मतदार संघातील सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादीचे पुर्नरिक्षण कार्यक्रम (मतदार यादीतील नाव वगळणे/ समाविष्ठ करणे/ दुरुस्ती) सुरु आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे ज्या मतदारांचा फोटो मतदार यादीत नाही ते मतदार मागील अनेक वर्षापासून सदर पत्त्यावर राहत नाही तसेच काही मतदार मयत झाल्याबाबत अहवाल बी.एल. ओ. यांनी या कार्यालयात दाखल केलेले आहेत. जे मतदार मयत झालेले आहेत जे मतदार दिलेल्या पत्तयावर आढळून आलेले नाहीत अशांचा बी.एल.ओ मार्फत प्राप्त झालेल्या अहवालानुसार मतदार नोंदणी नियम 1960 चे नियम 21 (अ) नुसार सदर मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया आयोगाच्या कार्यपध्दतीप्रमाणे करण्यात येणार आहे.


  तरि नावे वगळण्यात येणाऱ्या मतदारांची यादी ही जिल्हा निवडणूक अधिकारी लातूर यांचे कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय लातूर, तहसील कार्यालय लातूर,पंचायत समिती कार्यालय, लातूर, सर्व मतदार केंद्र या ठिकाणी प्रसिध्द करण्यात येत असून ज्या मतदारांची फोटो नाहीत त्यांनी त्यांचे फोटो व सदरील यादीतील नाव वगळण्यास आक्षेप असणाऱ्या व्यक्तींनी त्यांचा लेखी आक्षेप मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)व निवडणूक विभाग तहसील कार्यालय लातूर येथे हे वृत्त प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसांत दाखल करावे. अन्यथा कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास मतदार नोंदणी नियम 1960 चे नियम 21 (अ ) नुसार कार्यवाही अनुसरण्यात येईल याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी स्वप्निल पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.