मध्य रेल्वे च्या महाव्यवस्थापकासोबत राज्यमंत्री बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठक उदगीरच्या शिष्टमंडळाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद


 मध्य रेल्वे च्या महाव्यवस्थापकासोबत राज्यमंत्री बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठक

उदगीरच्या शिष्टमंडळाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद
उदगीर : मुंबई ते बिदर व्हाया उदगीर ही रेल्वे नियमित करणे या मागणीसह उदगीरच्या अनेक रेल्वे प्रश्नासंदर्भात आज सोमवारी मुंबई येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मित्तल यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत मित्तल यांनी उदगीरकरांच्या मागण्याबाबत सकारात्मकता दाखविली असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली.
उदगीर येथून मुंबई ला जाणारी बिदर ते मुंबई, पुण्याला जाणारी हैदराबाद ते पुणे या दोन्ही रेल्वे नियमित कराव्यात या मागणीसह रेल्वे संदर्भातील अनेक मागण्यांसाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या पुढाकारातून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मित्तल यांच्यासोबत मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, सचिव मोतीलाल डोईजोडे यांची उपस्थिती होती.
लातूर रोड ते कुर्डुवाडी या रेल्वे मार्गाचे चालू असलेल्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. शिवाय लातूरच्या पिटलाईन बजेटबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
उदगीरच्या रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकानी या बैठकीत सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली.