हत्तीबेटावर भरली शिक्षकांची शाळा






हत्तीबेटावर भरली शिक्षकांची शाळा

उदगीर--या तालुक्यातील देवर्जन गावाजवळ असलेल्या हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या गडावर शनिवारी उदगीरच्या लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयाच्या शिक्षकांची शाळा भरली होती.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयातील शिक्षकांचे एक दिवशीय उदबोधन शिबीर हत्तीबेटावर पार पडले. शिबिराचे उदघाटन लातूर जि. प. च्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे स्थानिक अध्यक्ष मधुकर वटमवार, कार्यवाह शंकरराव लासुने, षण्मुखानंद मठपती,मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, देविदास राठोड,श्रीपाद सिमंतकर,उपमुख्याध्यापक श्रीहरी दराडे, व्याख्याते श्रीहरी वेदपाठक, सुनील वसमतकर यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक निवृत्ती दराडे यांनी केले.
यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे म्हणाल्या की,शिक्षक हा समाजासाठी प्रेरणेचा स्त्रोत असल्याने शिक्षकांनी नव तंत्रज्ञानाशी जुळवून घेवून विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करण्याचे आवाहन केले. व्याख्याते श्रीहरी वेदपाठक यांनी शिक्षकांचे उडबोधन शिबीर होणे ही काळाची गरज असून, शिक्षकांनी मोठ्या आत्मविश्वासाने व उत्साही मनाने अध्यापन करावे व व्यवसाय निष्ठा बाळगून आपल्या कार्याची गुणवत्ता वाढवावी असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रीती दुरुगकर व एकनाथ राऊत यांनी तर आभार अंबुताई दीक्षित यांनी मानले, या कार्यक्रमासाठी माधव मठवाले,मनोज भंडे, संतोष कोले, किरण नेमट,स्मिता मेहकरकर,मंगेश मुळी यांनी पुढाकार घेतला.

टिप्पण्या
Popular posts
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज