*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*

 *राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट*

*तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*


उदगीर : ग्रामीण भागातील नागरिकांची शेतीच्या कागदपत्रासाठी होणारी हेळसांड लक्षात घेऊन उदगीरचे आमदार तथा राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी उदगीर तालुक्यातील तलाठी भवन व मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयाच्या बांधकामासाठी नऊ कोटी नव्यानव लाख रुपयांचा निधी राज्यशासनाकडून मंजूर करून घेतला आहे. आज ना. संजय बनसोडे यांचा आज वाढदिवस असून या वाढदिवसाच्या निमित्ताने उदगीरकराना ही त्यांनी दिलेली भेटच म्हणावी लागेल.

         तलाठी व मंडळ अधिकारी म्हणजे शेतकऱ्यासाठी व नागरिकांसाठी प्रशासनातील महत्वाचा घटक आहे. शेतीची कागदपत्रे काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपला तलाठी शोधण्याची वेळ येत असते. शेतकरी बांधवांची होत असलेली अडचण लक्षात घेवून राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर तालुक्यात तलाठी भवन व मंडळ अधिकारी यांचे कार्यालय कार्यान्वित व्हावेत यासाठी राज्यशासनाकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून नऊ कोटी नव्यानव लाख पाच हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास राज्यशासनाने मान्यता दिली असल्याची माहिती राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. आता शेतकऱ्यांना तलाठी शोधत बसण्याची गरज राहणार नसून हे तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या कार्यालयात बसून नागरिकांना सेवा देतील असेही ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज