*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन

 *महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन


निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली व कृषी दिनानिमीत्त महाविद्यालय परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ वर्धापन दिनाचे औचित्य साधून निलंगा येथील कामगार कल्याण केंद्राचे संचालक श्री संगमेश्वर जिरगे व केंद्र महिला कल्याण साह्यीका सौ. गिरी आर. पी. यांनी कामगार कल्याण विभागाच्या वतीने महाविद्यालय परीसरातील वृक्षारोपणासाठी बहावा, पिंपळ, करंजी या वृक्षांची रोपे देऊन वृक्षारोपण कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. माधव कोलपुके, उपप्राचार्य डाॅ. चंद्रकुमार कदम, कनिष्ठ महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॅ. सुभाष बेंजलवार, डाॅ. विठ्ठल सांडूर, प्रा. विश्वनाथ जाधव, डाॅ. धनंजय जाधव डाॅ. बालाजी गायकवाड, प्रा. गोविंद शेंडगे, डाॅ. भास्कर गायकवाड, डाॅ. हंसराज भोसले, डाॅ. गोविंद शिवशेट्टे, डाॅ. ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. सुनिल गरड, प्रा. परवेज शेख, प्रा. उसनाळे श्री कुमार कोळी इत्यादिंची कोव्हीड १९ नियमांचे पालन करून उपस्थीती होती.

Popular posts
*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*
Image
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 94.70 टक्के 
Image
महात्मा पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
Image
जिजाऊ ब्रिगेडचा उपक्रम: शिवजयंतीचे औचित्य जाधव हॉस्पिटलमध्ये मोफत मधुमेह व रोगनिदान तपासणी शिबीर संपन्न उदगीर : येथील डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या जाधव हॉस्पिटलमध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत मधुमेह, रक्तदाब व इतर रोगनिदान तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश सचिव विवेक सुकणे होते. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप ढगे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अनिता जाधव, तालुकाध्यक्षा पुष्पाताई जाधव, डॉ. हर्षवर्धन जाधव, डॉ. शिल्पा जाधव, सिद्धेश्वर लांडगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव अनिता जगताप यांनी केले. आभार संत तुकोबाराय साहित्य परिषदेच्या तालुकाध्यक्षा प्रतिभा मुळे यांनी मानले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
Image
उदगीर अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे २०२० चे वाड:मय पुरस्कार जाहीर
Image