माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिबिरात 93 जणांचे रक्तदान

 स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर  माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा मध्ये रक्तदान शिबिराचे व वृक्ष लागवडीचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री. अशोक शिवाजीराव  पाटील निलंगेकरसाहेब (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी )यांनी केले. या रक्तदान शिबिरात एकूण  93  रक्तदात्यांनी रक्तदान केले.  

      यावेळी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर , अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनीताताई  चोपणे , डॉ लालासाहेब देशमुख ,प्राचार्य डॉ कोलफुके सर, उपप्राचार्य प्रा प्रशांत गायकवाड सर, यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली .यासाठी  प्राचार्य. डॉ. भागवत पौळ, प्राचार्य डॉ.एस. एस. पाटील, प्रा. गजेंद्र तरंगे, प्रा ठाकरे सर व संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.