95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नवोदित कवींना संधी

 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नवोदित कवींना संधी 


उदगीर : 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर येथे संपन्न होणार आहे. त्यानिमित्त नवोदित कवींना जास्तीत जास्त संधी देण्यासाठी कविकट्टा निर्माण करण्यात आला आहे. त्यासाठी नवोदित कवींनी https:\\abmss95.mumu.edu.in या संकेतस्थळावरुन गुगल फॉर्म भरुन दि. 15/03/2022 पर्यंत आपली स्वरचित एक कविता पाठवून देण्याचे आवाहन 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संयोजन समिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे. 

अटी व शर्ती : 

1. कविता स्वरचित असावी. 

2. कविता 3 मिनिटात सादरीकरण होणारी असावी. 

3. कविता राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोख्याचा भंग होणार नाही अशी असावी.

4. कविता मराठी भाषेतूनच असावी. 

5. वेळेत आलेल्या व समितीने निवड केलेल्या कवितांना सादरीकरणासाठी संधी देण्यात येईल. 

6. निवडीचे सर्व अधिकार निवड समितीस राहतील.

7. कोविड 19 चे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे.  


असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, संस्थेचे उपाध्यक्ष व मराठवाडा साहित्य परिषद उदगीर शाखेचे अध्यक्ष  रामचंद्र तिरुके, संस्थेचे सचिव प्रा. मनोहर पटवारी व समिती प्रमुख विवेक होळसंबरे, डॉ. संजय कुलकर्णी, मुकेश कुलकर्णी, अंबादास केदार, महेश मळगे, श्रीपाद सिमंतकर, विक्रम हलकीकर, प्रा. सौ. वंदना बांसवाडेकर, सौ. अश्विनी निवर्गी, सौ. प्रतिभा मुळे यांनी केले आहे.