उदयगिरीत अ. भा. म. सा.संमेलनानिमित्त साहित्यिकांची बैठक संपन्न


 उदयगिरीत अ. भा. म. सा.संमेलनानिमित्त साहित्यिकांची बैठक संपन्न 

 उदगीर : ( दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ ) ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच उदगीर तालुक्यातील साहित्यिकांशी संमेलनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठीची नियोजन बैठक महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, 'मसाप'चे उपाध्यक्ष विवेक होळसंबरे, सदस्य डॉ. प्रकाश देशपांडे, प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे, प्रा. जे.आर.कांदे, प्रा. श्रीराम चामले, ज्योती डोळे, एकनाथ राऊत, प्रा. राजपाल पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, प्रभारी प्राचार्य डॉ.आर .आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांची उपस्थिती होती. 

           संमेलन संस्मरणीय होण्यासाठी प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव, प्रा. डॉ. सुरेश शिंदे, प्रतिभा मुळे, प्रा. महादेव खताळ, प्रा. डॉ. नरसिंग कदम, गोविंद सावरगावे, डॉ. संजय कुलकर्णी, अंबादास केदार, ऍड. महेश मळगे, युवराज धोत्रे, डॉ. प्रकाश देशपांडे, अश्विनी निवर्गी, शिवकुमार डोईजोडे, प्रीती शेंडे, व्ही .एस.कुलकर्णी, ज्योती डोळे, प्रगती संगुळगे यांनी चर्चेत सहभाग घेऊन विधायक सूचना केल्या. यावेळी नाशिक येथील संतोष हुदळीकर यांनी बालकुमार साहित्य मेळाव्याच्या आयोजनासाठी सर्वांनी मनापासून कल्पकतेने, क्षमता वापरून काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अंबरखाने म्हणाले, उदगीरच्या संमेलनात अनेक ज्वलंत व लोकोपयोगी विषयावर कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. तिरुके म्हणाले, साहित्य संमेलनाचे स्वरूप व्यापक होण्यासाठी लोकसहभागाचा उपक्रम महाविद्यालय राबवत आहे. याकामी सर्व साहित्यिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून, विविध समित्यांमध्ये सहभागी होऊन संमेलन यशस्वीतेसाठी ऐतिहासिक कार्य पार पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात नागराळकर म्हणाले, साहित्यिकांच्या बैठकीमध्ये विधायक झालेली चर्चा ही साहित्य संमेलनाच्या यशाची नांदी आहे. साहित्य संमेलनात सर्वांना सहभागी करून सन्मान राखण्यासाठी प्रयत्न केला जात असून प्रतिभावंतांना संधी दिली जाणार आहे. हे साहित्य संमेलन 'आपले' आहे, अशी भावना ठेवून सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'मसाप'चे उपाध्यक्ष विवेक होळसंबरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी.बी. बळवंत यांनी तर आभार प्रा. एस. बी. येडले यांनी मानले.

Popular posts
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
माझे आदर्श गुरू...🙏
Image
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image