उदयगिरीत अ. भा. म. साहित्य संमेलनानिमित्त मुख्याध्यापकांची बैठक संपन्न

 उदयगिरीत अ. भा. म. साहित्य संमेलनानिमित्त मुख्याध्यापकांची बैठक संपन्न 


मुख्याध्यापकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आयोजक संस्थेला संमेलन यशस्वितेचा आला विश्वास
उदगीर : ( दिनांक १० फेब्रुवारी २०२२ ) ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उदगीर परिसरातील जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळातील मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद उदगीरचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा .मनोहर पटवारी, सदस्य ऍड. प्रकाश तोंडारे, पंचायत समिती सभापती प्रा. डॉ. शिवाजी मुळे, गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर .के .मस्के, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, संतोष हुदळीकर यांची उपस्थिती होती. या बैठकीस मुख्याध्यापकांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी प्रा. पटवारी म्हणाले, साहित्य संमेलनात सर्वांचा सहभाग अपेक्षित असून त्यासाठी परिश्रम करावे लागतील. हुदळीकर म्हणाले, संमेलनात बालकुमार साहित्यिकांचा मेळावा अनोखा उपक्रम होणार आहे. विद्यार्थ्यांची संमेलनाशी नाळ जोडण्यासाठी प्रयत्न व्हावेत. साहित्य संमेलन संस्मरणीय होण्यासाठी रामदास केदार, धनंजय गुडसूरकर, ज्ञानेश्वर नकूरे, प्रतिभा मुळे, प्रा.जे.आर. कांदे, प्रा. डॉ. आर .के. मस्के यांनी विधायक सूचना मांडल्या. सभापती प्रा. शिवाजी मुळे म्हणाले, साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी कार्यक्षमतेने काम करून आपल्या परिसराचा लौकिक वाढवावा. समारोपात नागराळकर म्हणाले, भावी पिढी सुसंस्कृत होण्यासाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाचे निमित्त साधून साहित्य संमेलनाचे आयोजन सर्वांना सोबत घेऊन केले जाणार असून त्यात सर्वांचा सक्रिय सहभाग असावा. आपल्या सर्वांच्या सहभागाने हे संमेलन 'आपले' व्हावे, अशी भावना व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी तर आभार रामचंद्र तिरुके यांनी मानले. यावेळी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अंजली स्वामी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Popular posts
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
माझे आदर्श गुरू...🙏
Image
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image