शिवरायांचे आठवा रूप ....शिवरायांचा आठवावा प्रताप ... उदगीरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा कार्यक्रम शाहीर सुरेश जाधव यांनी पोवाड्यातून साकारले शिवचरित्र

 शिवरायांचे आठवा रूप ....शिवरायांचा आठवावा प्रताप ...

उदगीरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा कार्यक्रम

शाहीर सुरेश जाधव यांनी पोवाड्यातून साकारले शिवचरित्र



उदगीर : शिवरायांचे आठवा रूप....शिवरायांचा आठवावा प्रताप या पोवाड्यातून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शाहीर सुरेश जाधव यांनी उपस्थित शिवभक्तांसमोर शिवचरित्र साकारले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधून येथील नगर परिषदेच्या प्रांगणात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शाहीर सुरेश जाधव यांच्या पोवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, मादलापूरचे सरपंच उदय मुंडकर, माजी पाणीपुरवठा सभापती मनोज पूदाले, व्यंकटराव पाटील अवळकोंडेकर, बाजार समितीचे संचालक संतोष पाटील किणीकर, माजी नगरसेवक गजानन सताळकर, ऍड. दत्ताजी पाटील, समीर शेख, गणेश गायकवाड, अनिल मुदाळे, धनाजी मुळे, बाळासाहेब पाटोदे, श्याम डावळे, नवनाथ गायकवाड, गोविंद भालेराव,अजय शेटकार, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या उत्तरा कलबुर्गे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस उषा कांबळे, माजी नगरसेविका बबिता भोसले, सरोज वारकरे, उपक्रमशील शिक्षिका नीता मोरे, उद्योजक बिपीन पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सूर्यवंशी, ओम गंजुरे, सतीश पाटील, मदन पाटील, नितीन एकुरकेकर, यशवंत पाटील, अंकुश ताटपल्ले, बालाजी पाटील नेत्रगावकर, जिजाऊ ब्रिगेडच्या पुष्पलता जाधव, अनिता जाधव, मंदाकिनी जीवने, बबिता पांढरे यांच्यासह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
यावेळी आपल्या पोवाड्यातून शाहीर सुरेश जाधव यांनी, शिवरायांची लढाई जाती धर्माच्या विरोधात नव्हती तर ती राजकीय होती असे सांगून देशाचा रक्षक राजा, चारित्र्याचा पालक राजा अशा प्रकारची ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचे काम केले असल्याचे सांगितले. यावेळी शिवरायांच्या वीरतेचे दर्शन देणारे, राजमाता जिजाऊ च्या शिकवणीचा संदेश देणारे पोवाडे सादर करून शिवरायांचा जयजयकार करण्यात आला.
Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही