इनरव्हील क्लब उदगीर तर्फे बाल मावळ्यांसोबत शिवजयंती दणक्यात साजरी

 

इनरव्हील क्लब उदगीर तर्फे बाल मावळ्यांसोबत शिवजयंती दणक्यात साजरी

पोवाडा व वेशभूषा स्पर्धा

उदगीर : शिवजयंती आपल्या मानाचा, अभिमानाचा आणि आपले जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव.जय भवानी! जय शिवराय !
शिवरायांचे नाव घेताच अंगात उत्साह येतो ,जोश येतो अंगातील रक्त उसळून येतं काय आहे या नावाची जादू ?हे कोणत टाॅनिक आहे जे वर्षानुवर्षे युगेयगे समजाला प्रेरित करत आहे. ही प्रेरणा आहे त्यांच्या कर्तृत्वाची, शौर्याची, औद्यार्याची,धाडसाची
आज कालच्या पिढीला शिवरायांचा इतिहास वाचून, ऐकून माहिती आहे पण हा इतिहास या बाल गोपालांनी स्वतः समजून उमजून घ्यावा.शिवस्तुती त्यांनी आपल्या निरागस आवाजातून वर्णन करावी यासाठी इनरव्हील क्लब उदगीरने सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय उदगीर येथे पोवाडा व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता
प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब तर्फे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ अपर्णा पटवारी(उपाध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय) होत्या. याच बरोबर मंचावर अध्यक्ष (सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय)भगवानराव वट्टमवार कार्यवाह (सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय)अंबादासराव देशमुख इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ मीरा चंबुले, उपाध्यक्ष सौ स्वाती गुरुडे, सचिव सौ शिल्पा बंडे, कोषाध्यक्ष सौ मानसी चन्नावार ,एडिटर सौ पल्लवी मुक्कावार,आय ओ एस सौ स्नेहा चणगे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रोजेक्ट प्रमुख होत्या सौ उषा कुलकर्णी प्राचार्या मातृभूमी महाविद्यालय, उदगीर हा कार्यक्रम अतिशय थाटात सुंदर,भव्य दिव्य पध्दतीने पार पडला यासाठी सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयातील संस्थेचे सर्व पदाधिकारी, मराठी विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा कुलकर्णी,सेमी विभाग प्रमुख सौ आशा बेंजरगे सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.पालकांचा ही खूप उस्फुर्तपणे सहभाग व उपस्थिती होती.चिमुकल्यांनी अतिशय सुरेख वेशभूषा व पोवडा सादर केला.
सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत असते
या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजच्या गोंडस रूपात शिवरायांचे व बाळमावळ्यांचे तेज दिसत होते. असे मत इनरव्हील क्लब उदगीरच्या उपाध्यक्षा सौ स्वाती गुरुडे यांनी व्यक्त केले.

शिवजयंती निमित्त इनरव्हील क्लब उदगीर तर्फे शिवरायांना दिलेल्या या मानवंदनचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image