महापुरूषांचे विचार नव्या पिढीला प्रेरणादायी : अरविंद पाटील निलंगेकर

 


महापुरूषांचे विचार नव्या पिढीला प्रेरणादायी : अरविंद पाटील निलंगेकर

निलंगा : थोरामोठ्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी व नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने जयंती मोहत्सव सामाजिक उपक्रम राबवून करावी असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यानी केले.

निलंगा येथे संत शिरोमनी गुरू रविदास सार्वजनिक जयंती मोहत्सव कार्यक्रमात ते अध्यक्षीय समारोपात  बोलत होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून प्रा.डॉ.आर.डी.कांबळे,नवनाथ कांबळे ,ज्योतिराम कांबळे,डॉ एस.एस.शिंदे,बाळासाहेब शिंगाडे,मनोज कोळ्ळे,माधव लांडगे,विनायक वाघमारे,ईस्माइल लदाफ,शेषराव ममाळे,रोहित बनसोडे,दयानंद चोपणे अदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले माणसाने विचाराने अल्पसंख्याक असू नये तर महामानवाच्या विचारावर मार्गक्रमन करत रहावे घराबाहेर पडल्यानंतर अनेक अडथळे आव्हाने स्वीकारून आपली प्रगती करणे हेच खरे महामानवांचे विचार आहेत.जयंती मोहत्सावात नशेच्या धुंदित नाचण्यापेक्षा महापुरूषांच्या विचारांच्या धुंदित असावे व चर्मकार समाजाच्या प्रत्येक अडचणीत मी खांद्याला खांदा लावून आपल्या संघर्षात सदैव सोबत आहे.असा विस्वास निलंगेकर यानी दिला.संत रविदास महाराज यांचे निलंगा शहरात भव्य मंदिर व सभागृह उभा करून शहराच्या सौंदर्यात भर घालू व त्यांचे विचार नव्या पिढीला प्रेरणादायी असतील शहरात देवालय उभा करू असे अश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक कवि माधव लांडगे तर सु\ासंचलन भिवाजी लखनगावे व बालाजी जाधव यानी तर आभार रनविर भालके यानी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहू चित्ते रमेश सातपुते तुषार सोमवंशी धनाजी जाधव,अमोल जाधव,गंगाधर भालके,भागवत जाधव ,भरत वाघमारे,काशीनाथ जाधव,विठ्ठल कांबळे,शिवाजी वाघमारे,नागोराव वाघमारे,उध्दव कांबळे,भिवाजी मिरखले,महेश जाधव,संतोष जाधव,अरूण पिंपळे,ज्ञानेश्वर जाधव,सतीश जाधव,अदीने परिश्रम घेतले.

टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज