साहित्य संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमात संघ पाठवण्याचे आवाहन

 साहित्य संमेलन सांस्कृतिक कार्यक्रमात संघ पाठवण्याचे आवाहन

 उदगीर : ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात होणार असून त्यात विविध कला प्रकारांचे सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रमात होणार आहे. त्यानिमित्ताने आपल्या महाविद्यालयातील संघाची निवड करून विद्यार्थी व कला प्रकार सुगम गायन, समूह गायन, शास्त्रीय गायन, ताल व सुर वाद्य, नृत्य, लोककला प्रकार (गोंधळ, भारुड ,लावणी ,वासुदेव ) याचे सादरीकरण केले जाणार आहे. इच्छुकांनी आपली नावे २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सांस्कृतिक समितीचे प्रा. प्रसाद जालनापूरकर( 9890103190) प्रा. डॉ. वंदना बासवाडेकर यांच्याकडे पाठवावीत असे आज सांस्कृतिक मंडळाच्या झालेल्या बैठकीत ठरले. बैठकीस समन्वयक दिनेश सास्तुरकर, समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. बी. एम. संदीकर, प्रा.बी. एन. गायकवाड, प्रा. डॉ. मुकेश कुलकर्णी, प्रा. अश्विन वळवी यांची उपस्थिती होती. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर ,उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद उदगीरचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ.आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ.आर .के .मस्के यांनी केले आहे.