इनरव्हील क्लब उदगीर द्वारा कर्करोग जन जागृती शिबिराचे मंगलाय हाॅस्पिटल मध्ये आयोजन......

 इनरव्हील क्लब उदगीर द्वारा कर्करोग जन जागृती शिबिराचे मंगलाय हाॅस्पिटल मध्ये  आयोजन......



दिनांक ४ फेब्रुवारी कर्करोग जागृती दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब उदगीर तर्फे कर्करोग जन जागृती शिबिराचे मंगलाय हाॅस्पिटल येथे आयोजन करण्यात आले .  कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंगलाय हाॅस्पिटलच्या डॉ सुप्रिया जगताप यांनी कर्करोग लक्षणे , कर्करोग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी या विषयी सध्या सोप्या भाषेत , सुंदर असे मार्गदर्शन केले. रक्ताचा कर्करोग, महिलांमधील काही प्रकारचे कर्करोग या विषयी सविस्तर माहिती सांगितली. पौष्टिक आहार , नियमित व्यायाम केला पाहिजे कर्करोगाची काही प्राथमिक लक्षणे दिसताच तपासणी करून घेतली पाहिजे कर्करोग बरा होऊ शकतो त्याची भिती न बाळगता लवकरात लवकर उपचार घेतले पाहिजे असे डॉ सुप्रिया जगताप यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले याच बरोबर कर्करोग होऊ नये म्हणून लस  उपलब्ध आहेत  वयाच्या काही मर्यादेत ती लस घेऊन आपण सुरक्षित राहू शकतो असे ही त्या म्हणाल्या . इनरव्हील क्लब उदगीर तर्फे करण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे  त्यांनी कौतुक केले 

या वेळी कर्करोग जन जागृती साठी इनरव्हील क्लब उदगीर तर्फे हाॅस्पिटलमध्ये सर्वत्र या आजारांची लक्षणे,उपाय, खबरदारी या बद्दल पोस्टर लावण्यात आली. या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ मीरा चंबुले, उपाध्यक्ष सौ स्वाती गुरुडे, कोषाध्यक्ष सौ मानसी चन्नावार, एडिटर सौ पल्लवी मुक्कावार,आय. एस. ओ सौ स्नेहा चणगे याच बरोबर सदस्य सौ राखी सुगंधी,सौ पुजा गर्जे,सौ अश्विनी देशमुख आणि मंगलाय हाॅस्पिटलच्या सर्व कर्मचारींची उपस्थिती होती. डॉ सुप्रिया जगताप आणि मंगलाय हाॅस्पिटल यांनी खूप मोलाची साथ मिळाली.

Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही