सायकलिंग ग्रुपच्या माध्यमातून गावोगावी साहित्य संमेलनाचा प्रचार व प्रसार 50 जणांची टीम लागली कामाला

सायकलिंग ग्रुपच्या माध्यमातून गावोगावी साहित्य संमेलनाचा प्रचार व प्रसार

50 जणांची टीम लागली कामालाउदगीर : सदैव विविध समाजकार्यात कार्यरत असलेल्या उदगीर येथील सायकलिंग ग्रुपच्या वतीने उदगीर येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा गावोगावी जाऊन प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ आज दि. 27 मार्च रोजी शिवाजी चौकात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, डॉ. श्रीकांत मधवरे, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, प्रा. डॉ. गौरव जेवळीकर, सायकलिंग ग्रुपचे प्रमुख विवेक होळसंबरे उपस्थित होते.
उदगीर येथे दि. 22, 23 व 24 एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून हे संमेलन ग्रामीण भागात पोहोचावे याकरिता उदगीर येथील सायकलिंग ग्रुपच्या वतीने गावोगावी जाऊन या संमेलनाचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. या ग्रुप मध्ये विवेक होळसंबरे यांच्यासह अनिरुद्ध जोशी, सुनिल ममदापूरे, अतुल वाघमारे, जगदिश पंडित, बालाजी इंद्राळे, नागनाथ वारद, दिपक पाटील, रामेश्वर सोनी, कपिलदेव कल्पे , कपिल वट्टमवार, ज्ञानेश्वर चंडेगावे, सतीष चवळे, गणेश कांबळे, डॉ. गजानन टिपराळे, दत्तात्रय आडके, संदीप आडके, डॉ. मनोज कामशेट्टे, सुशीलकुमार पांचाळ, मुकेश कुलकर्णी, नवनाथ मोरखंडे, नारायण पोले, सतीष पाटील, डॉ प्रविण मुंदडा, कांचनकुमार केंद्रे, परमेश्वर बिरादार, प्रसाद जालनापूरकर यांच्यासह 50 जणांचा समावेश आहे. ही टीम रोज सकाळी विविध गावात जाऊन संमेलनासंदर्भात माहिती सांगून विद्यार्थ्यासह अबाल वृद्धांना या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहे.