95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नवोदित बालसाहित्यिकांना संधी

 


95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नवोदित बालसाहित्यिकांना संधी 


उदगीर : 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर येथे संपन्न होणार आहे. त्यानिमित्त नवोदित बालसाहित्यिकांना जास्तीत जास्त संधी देण्यासाठी बालकुमार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नवोदित कवींनी https:\\abmss95.mumu.edu.in या संकेतस्थळावरुन गूगल फॉर्म भरुन दि. 25/03/2022 पर्यंत आपली स्वरचित एक कविता किंवा कथा पाठवून देण्याचे आवाहन 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संयोजन समिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

अटी व शर्ती :
1. कथा/कविता स्वरचित असावी.
2. कविता 3 मिनिटे व कथा 5 मिनिटांत सादर होणारी असावी.
3. कथा/कविता राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोख्याचा भंग होणार नाही अशी असावी.
4. कथा/कविता मराठी भाषेतूनच असावी.
5. वेळेत आलेल्या व समितीने निवड केलेल्या कथा/कवितांना सादरीकरणासाठी संधी देण्यात येईल.
6. निवडीचे सर्व अधिकार निवड समितीस राहतील.
7. कोविड 19 चे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे.

असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, संस्थेचे उपाध्यक्ष व मराठवाडा साहित्य परिषद उदगीर शाखेचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, संस्थेचे सचिव प्रा. मनोहर पटवारी व समितिसमन्वयक प्रा. सौ. डॉ. स्मिता नागोरी (लखोटिया),श्री. रसूल पठाण, श्री. धनंजय गुडसूरकर, प्रा रामदास केदार यांनी केले आहे.
Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही