साहित्य संमेलनाचे आयोजकत्व मिळणे हा जिल्ह्याचा बहुमान – आ. रमेश कराड

 साहित्य संमेलनाचे आयोजकत्व मिळणे हा जिल्ह्याचा बहुमान – आ. रमेश कराड


उदगीर : ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उदगीरला मिळालेली संधी ही लातूरच्या गौरवात भर टाकणारी असून जिल्ह्याचा बहुमान वाढविणारी आहे असे मत आ. रमेश कराड यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजन बैठकीत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ. सुधाकर भालेराव, माजी. आ. गोविंद केंद्रे, संस्था उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद शाखा उदगीरचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके ,माजी आमदार तथा संस्था सचिव मनोहरराव पटवारी, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य रामप्रसाद लखोटिया, प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. के. मस्के, बापुराव राठोड, विक्रम शिंदे, सतीष आंबेकर, भागवत सोट, माधव टेपाले, बालाजी गवारे, मिनाक्षी पाटील, वंदना गरड, श्यामल कारामुंगे, मंदाकिनी जीवने यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना आ. कराड म्हणाले निस्वार्थी, प्रामाणिक व हक्काच्या कार्यकर्त्यावर संमेलन यशस्वी होत असते. साहित्य संमेलन आयोजनाचा बहुमान जिल्ह्याला मिळाला ही आनंदाची बाब आहे. साहित्य संमेलनातील कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन उपस्थितांना केले. प्रास्ताविकात तिरुके म्हणाले, साहित्य संमेलन सर्वांच्या सहभागातून यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी भालेराव म्हणाले, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयास वैभवसंपन्न  वारसा असल्याने संमेलन यशस्वी होईल, असा आशावाद व्यक्त केला.  

अध्यक्षीय समारोप करताना नागराळकर म्हणाले, साहित्य संमेलन पक्ष, जात, धर्म, यापेक्षा सर्व जिल्ह्याचे कसे होईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मराठी भाषा व साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी संस्थेने हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त संमेलनाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. भालचंद्र करंडे यांनी तर आभार प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी मानले.

Popular posts
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
हरिश्चंद्र बिराजदार सारख्या खेळाडूंमुळे लातूरचे नाव देशपातळीवर पोहोचले : ना. संजय बनसोडे
Image