चार राज्यात भाजपाचा विजय: उदगीर येथे फटाके फोडून जल्लोष साजरा

चार राज्यात भाजपाचा विजय: उदगीर येथे फटाके फोडून जल्लोष साजरा



उदगीर: नुकत्याच झालेल्या विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी झाल्याबद्दल उदगीर येथील भारतीय जनता पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात ढोल ताशाचा गजर करीत फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड व मणिपूर या चार राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. भाजपा विजयी झाल्याचे कळताच उदगीरच्या शिवाजी चौकात भाजपच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, शहराध्यक्ष मनोज पुदाले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, ज्येष्ठ नेते मनोहर भंडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अमोल निडवदे, ऍड. दत्ताजी पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मीनाक्षी पाटील, माजी तालुकाध्यक्ष वसंत शिरसे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, डॉ. प्रकाश येरमे, श्रीराम कुलकर्णी, बापूराव यलमटे, व्यंकट काकरे, मारुती कोटलवर, शंकर रोडगे, आंनद बुंदे, रामेश्वर पवार, दिलीप मजगे, डॉ. चंद्रकांत कोठारे, उदयसिंह ठाकूर, अनुसूचित जाति मोर्चा जिल्हाध्यक्ष बालाजी गवारे, भाजपा जिल्हा सरचिटणीस शामल कारामुंगे, अरुणा चिमेगावे, महादेव टेपाले, साईनाथ चिमेगावे, लखन कांबळे, तादलापुर सरपंच राजकुमार पाटील, अमर सूर्यवंशी, शहाजी पाटील, सावन पस्तापुरे, गणेश गायकवाड, अमोल अनकल्ले, आनंद भोसले, आनंद साबने, आमेर शेख रवींद्र बेद्रे, अंकुश राठोड, सुनिल गुडमेवार, मारोती श्रीनेवार, मंगेश येरकुंडे, पप्पू भोसले सुनिल कलबुर्गी, गणराज जाधव, अक्षय घोरपडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' बुधवारी उदगीरात....*
इमेज