लातूर जिल्ह्यातील पहिली हाफ मॅरेथॉन निलंगा येथे संपन्न

 लातूर जिल्ह्यातील पहिली हाफ मॅरेथॉन निलंगा येथे संपन्न


निलंगा:  6 मार्च 2022 रोजी निलंगा हेल्थ अँड स्पोर्ट्स फाउंडेशन च्या वतीने निलंगा येथे "निलंगा हाफ मॅरेथॉन"(21km) आयोजित केली होती. या मॅरेथॉन चे उद्घाटन अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले. या स्पर्धेत महाराष्ट्रातून 500 पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.

21km कॅटॅगरी मध्ये पुरुष गटातून प्रथम क्रमांक प्रशांत पाटील, द्वितीय क्रमांक निवृत्ती गुंडेवार तर तृतीय क्रमांक वैभव कांबळे यांनी पटकावला.

तसेच महिला गटातून प्रथम क्रमांक योगिनी साळुंखे, द्वितीय क्रमांक 12 वर्षीय मयुरी पानचावरे हिने तर तृतीय क्रमांक अंजली महके हिने पटकावला.

या स्पर्धेतील विशेष बाब म्हणजे 12 वर्षीय मयुरी पानचावरे हिने लहान गटातून नाव न नोंदवता मोठया खुल्या 21km च्या गटात नाव नोंदवले व सर्व दिग्गज रनर्स ना मागे टाकत 21km मुलींच्या कॅटॅगरी मध्ये द्वितीय आली. 12 वर्षीय मयुरी पानचावरे ने उपस्थित सर्वांचे मने जिंकली.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण सौ संगीता पाटील निलंगेकर, पोलीस निरीक्षक  बाळकृष्ण शेजाळ, प्रमुख पाहुणे व प्रायोजक यांच्या हस्ते करण्यात आले.

या हाफ मॅरेथॉन ची आणखी एक विशेष बाब म्हणजे या मॅरेथॉन मध्ये मुंबई हुन " *आयर्न मॅन"*  शाम शिंदे सर यांनीही सहभाग घेतला होता. तसेच उस्मानाबाद हुन *"हाफ आयर्न मॅन"*  अमोल माने व प्रदीप खामकर यांनीही सहभाग घेतला होता.

निलंगा हाफ मॅरेथॉन चे रेस अंबेसिडर म्हणून डॉ आरती झंवर ,  शंकर लांडगे व  गंगाधर सोमवंशी यांनी सहभाग नोंदवला.

या हाफ मॅरेथॉनमध्ये एकूण 2km, 3km, 5km, 11km व 21km आशा 5 कॅटॅगरी ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक कॅटॅगरी मधून पुरुष व महिला गटा प्रमाणे प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक काढून सर्वांना बक्षीस वितरण करण्यात आले.

लातूर जिल्ह्यातील पहिलीच हाफ मॅरेथॉन यशस्वी करून निलंग्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

ग्रामीण भागात, तालुका स्तरावर, अतिशय सूक्ष्म नियोजन बद्ध व आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन आयोजित करून महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, अहमदनगर, हिंगोली, धुळे, बीड, उस्मानाबाद, अहमदपूर, लातूर, उदगीर इत्यादी विविध ठिकाणाहून आलेल्या सर्व रनर्स ची मने जिंकली.

निलंगा हाफ मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी निलंगा हेल्थ अँड स्पोर्ट्स फाउंडेशन चे  गणेश एखंडे (फाउंडर), डॉ  उद्धव जाधव, डॉ सचिन बसुदे, डॉ  भीम खलंगरे, हरिविजय सातपुते,  खदिर मासुलदार तसेच सर्व प्रायोजक, 100पेक्षा अधिक स्वयंसेवक व निलंग्याचे  तहसीलदार गणेश जाधव आणि  गट विकास अधिकारी  अमोल ताकभाते  यांनी विशेष प्रयत्न केले.

Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही