श्यामलाल,श्यामार्य मध्ये कथाकथनास प्रातिसाद: संमेलन आपल्या दारी उपक्रम

श्यामलाल,श्यामार्य मध्ये कथाकथनास प्रातिसाद: संमेलन आपल्या दारी उपक्रम 

उदगीर (वार्ताहर )


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात २२, २३ व २४ एप्रिल २०२२ या कालावधीत होत आहे. यानिमित्ताने आयोजित 'संमेलन आपल्या दारी' या उपक्रमातंर्गत आयोजित कथाकथनाच्या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.
श्यामलाल विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आनंद चोबळे हे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य व कथाकार धनंजय गुडसूरकर यांनी हृदयस्पर्शी कथा सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. व्यासपिठावर जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य राम मोतीपवळे, रसुल पठाण, संजय देबडवार, सुनिल बागडे, बालाजी चव्हाण उपस्थित होते. यावेळी रसूल पठाण, राम मोतीपवळे, उमाकांत सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. रेखा इंद्राळे यांनी सूत्रसंचालन तर नामदेव हत्ते यांनी आभार मानले. श्यामार्य कन्या विद्यालयात झालेल्या कथाकथन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तृप्ती पंडीत होत्या. स्मिता मेहकरकर, रसूल पठाण यांनी संमेलनाविषयी माहिती दिली. धनंजय गुडसूरकर, राम मोतीपवळे,रसूल पठाण, विवेक उगिले, संगीता सोनाळे उपस्थित होते. श्रीहरी निडवंचे यांनी सूत्रसंचालन तर एम.जी.कांबळे यांनी आभार मानले. दरम्यान नागलगाव व कोदळी केंद्रीय शाळेअंतर्गत चांदेगाव, टाकळी, शांतीनिकेतन विद्यालय कोदळी, प्रा.शा.देऊळवाडी व प्रा.शा.मुत्तलगाव येथे केंद्रप्रमुख शिवशंकर पाटील यांनी कथाकथन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कथाकार धनंजय गुडसूरकर व शिवशंकर पाटील यांनी कथा सादर केल्या. या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात रमाकांत बनशेळकीकर यांचे कथाकथन झाले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत बुधे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक मंजुषा कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेत विश्वनाथ मुडपे, रमाकांत बनशेळकीकर यांचे कथाकथन झाले. अध्यक्षस्थानी देविदासराव नादरगे हे होते.