धर्माबाद गोशाळेचे संचालक गिरीश जोशी यांची सोमनाथपुर गोरक्षण संस्थेस भेट







धर्माबाद गोशाळेचे संचालक गिरीश जोशी यांची सोमनाथपुर गोरक्षण संस्थेस भेट

उदगीर : धर्माबाद जि. नांदेड येथील गोशाळेचे संचालक गिरीश जोशी यांनी सोमनाथपुर येथील गोरक्षण संस्थेला भेट देऊन येथील कार्याची माहिती घेतली.
यावेळी संस्थेच्या वतीने रामदास जळकोटे, प्रशांत मांगुळकर, नारायण वाकुडे, नरसिंग कंदले यांच्यासह संस्थेतील कर्मचाऱ्यांनी गिरीश जोशी यांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी जोशी यांनी सोमनाथपुर येथील गोरक्षन संस्थेच्या कामाची माहिती घेऊन कौतुक केले. राज्यातील गोसेवेसाठी काम करणाऱ्या सर्व संस्थांनी एकत्रित येऊन राज्यसरकार वर दबाव टाकून गोसेवा आयोग निर्माण करून घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जेणेकरून या आयोगाच्या माध्यमातून अशा गोसेवेसाठी काम करणाऱ्या संस्थाना शासनाची मदत मिळविता येईल असेही यावेळी जोशी म्हणाले.
टिप्पण्या
Popular posts
लॉयनेस क्लब गोल्ड च्या अध्यक्षपदी सौ. संगीता नेत्रगावे पाटील यांची निवड.*
इमेज
महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ५१ जनांचे रक्तदान.    मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस चा उपक्रम.  
इमेज
प्रभाग 8 मध्ये निर्जंतुकिकरणाची फवारणी उदगीर:
इमेज
मराठी राजभाषा दिनानिमित्त उदयगिरीत 28 फेब्रुवारीला ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकरांचे व्याख्यान
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज