प्राचार्य डॉ. लहाने यांनी सेवाभाव समोर ठेवून काम केले* ------------------------------------------------ *जिव्हाळा ग्रुपच्या कार्यक्रमात मान्यवरांकडून गौरवोद्गार*

 *प्राचार्य डॉ. लहाने यांनी सेवाभाव समोर ठेवून काम केले*

------------------------------------------------
*जिव्हाळा ग्रुपच्या कार्यक्रमात मान्यवरांकडून गौरवोद्गार*
-------------------------------------------------


उदगीर : जळकोट सारख्या ग्रामीण भागात 12 वर्षे प्राचार्य म्हणून काम करीत असताना सेवाभाव ठेवून काम करून माणुसकीचे दर्शन देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने होय असे गौरवोद्गार जिव्हाळा ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी काढले.
प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने यांच्या जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालय येथील प्राचार्य पदाच्या कारकीर्दीस 12 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिव्हाळा ग्रुपच्या वतीने डॉ. लहाने यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देवीदासराव नादरगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माधव चंबूले, मुंबई येथील कांदिवली महाविद्यालयाचे उपप्राचार्य बस्वराज बिरादार, जिव्हाळा ग्रुपचे संस्थापक विश्वनाथ मुडपे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. माधव चंबूले यांनी रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून आजपर्यंत काम केले असून यापुढील काळात देखील सर्वांच्या आशीर्वादाने रुग्णांना जीवदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी डॉ. चंबूले म्हणाले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. लहाने म्हणाले की, गेल्या 12 वर्षात सहकाऱ्यासोबत काम करताना संस्थेचे हित जोपासून विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण व सुविधा देण्यासाठी काम केले असल्याचेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात नादरगे यांनी यश मिळविणे सोपे आहे पण ते पचविणे अवघड आहे, ते यश पचविण्याचा गुण डॉ. लहाने यांच्याकडे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात उषा तोंडचिरकर यांनी स्वागतगीत गायिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक रमाकांत बनशेळकीकर यांनी केले.
आभार शिवमूर्तीअप्पा भातांब्रे यांनी मानले. यावेळी विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, अशोक हाळे, व्ही. एस. कुलकर्णी, दशरथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जिव्हाळा ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.