साहित्य संमेलनाच्या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा: नागराळकर

साहित्य संमेलनाच्या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा: नागराळकर


उदगीर: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात होत असून या संधीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी जीवनाला दिशा द्यावी असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी केले ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संवाद विद्यार्थ्यांशी कार्यक्रमात बोलत होते. मंचावर संस्था कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य चंद्रकांत भद्रे, पर्यवेक्षक जोतीबा कांदे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती. साहित्य संमेलन आयोजनासंदर्भात सपना बिरादार, वसुंधरा बिरादार, अनिकेत पवार, विरेंद्र चिल्ले, शुभम काकरे, स्नेहा नामवाड, नम्रता सोनकांबळे, शुभम मोतीपवळे, समीर शेख या विद्यार्थ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
पुढे बोलताना नागराळकर म्हणाले संधी प्रत्येकाला खुनावते ती ओळखून आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास यश येते. विद्यार्थ्यांनी सेवाभावनेने व आपला घरचा कार्यक्रम समजून सहभागी होण्याचे आवाहन केले. अंतरविद्यापीठ बुध्दीबळ स्पर्धेत शुभम बिरादार याची व मार्गदर्शक प्रा. सतीश मुंढे यांचा सत्कार झाला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनोज खांडेकर यांनी केले. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. तांबोळीआर.आर. यांनी केले.दुपारी चार वाजता बालकुमार मेळावा समितीची बैठक झाली बैठकीस कार्याध्यक्ष बसवराजपाटील नागराळकर, संस्था कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रा. चंद्रकला रोट्टे, शिलाताई पाटील, समन्वयक प्रा. डॉ. एस. आर. नागोरी, रसूल पठाण, यांची उपस्थिती होती. उपक्रमशील शिक्षकांनी चर्चेत सहभागी होऊन मौलिक सूचना केल्या याच बैठकीत प्रा. जोतीबा कांदे यांनी ग्रंथदिंडी विषयी सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक स्म‍िता मेहकरकर यांनी केले आभार प्रा. रामदास केदार यांनी मानले. 
टिप्पण्या
Popular posts
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज