उदयगिरीच्या रासेयो शिबिराचा समारोप व संमेलन आढावा बैठक

 उदयगिरीच्या रासेयो शिबिराचा समारोप व संमेलन आढावा बैठक 


उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पर्यावरण नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धन व स्वच्छ भारत अभियान विशेष युवक शिबीराचा सोमनाथ पुर तालुका उदगीर येथे समारोप आणि 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आढावा बैठक आ. विक्रम काळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. अध्यक्षस्थानी कृषी आणि ग्रामविकास संस्था सुगाव चे सचिव गंगाधर पाटील दापकेकर होते.
मंचावर कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, प्रभारी प्राचार्य डॉ.आर. आर. तांबोळी, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव, अंकुश नाडे, गंगाधरआ, रडले ,रमेश बिरादार, अजित पाटील तोंडचिरकर, उपप्राचार्य डॉ.आर. के .मस्के, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.होकर्णे, प्रा. बी. एस. कांबळे, प्रा.डॉ.एस .आर. नागोरी, प्रा. डॉ. मल्लेष झुंगा स्वामी यांची उपस्थिती होती.
यावेळी आ. काळे म्हणाले, रा.से .यो.श्रमाचे सामाजिक बांधिलकीचे, संस्कार करणारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहे .विद्यार्थ्यांनी काम दाखवल्यास जग त्याची दखल घेते .जीवनाची दिशा ठरवून परिश्रम केल्यास यश येते, सर्वांच्या सहकार्याने अनोखे ,देखणे, नेटके साहित्य संमेलन होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला. नागराळकर यांनी विद्यार्थ्यांनी संमेलनातील पर्वणीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
शिबिरा विषयी प्रतिक्रिया शुभम मोतीपवळे, सुशील तिक्टे, यांनी दिली उत्कृष्ट स्वयंसेवक विजय पवार, सुशील तिकटे, शुभांगी भालेराव , रेणुका स्वामी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यापीठाच्या निर्देशानुसार आयोजित आजादी का अमृत महोत्सव निबंध स्पर्धेतील इंग्रजी भाषेत लक्ष्मी जाधव , निलेश आपटे उर्दूत शेख समरीन, बाग मारू मुस्कान मराठीत प्रियंका रोडे, स्नेहा नामवाड, हिंदीत नम्रता सोनकांबळे ,स्नेहा नाम वाड,कन्नड राहुल विलासराव सीमा कुसनुरे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शुभांगी भालेराव ने केले. आभार प्रा. डॉ. सुनंदा भद्रशेट्टे यांनी मानले.
Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही