माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख यांच्यासह अनेकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

 माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख यांच्यासह अनेकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश


निलंगा: निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख यांच्यासह निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व 100 कार्यकर्ते यांचा आज मुंबई येथे गांधी भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
निलंगा पंचायत समिती माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, चक्रधर शेळके युवक प्रदेश सरचिटणीस, सौ स्वाती जाधव प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा भाजप, विलास लोभे माजी प स सदस्य, वामन लिंबराज जाधव ताजपुर, वाडीकर भानुदास, शिंदे बालाजी, शेख इस्माईल, मुजीब सौदागर, सब्दर कादरी, (टिपू सुलतान संघटना) रामलिंग पटसळगे, ऍड. मनोज अलमले, ऍड. सुनील माने, ऍड. प्रवीण नरहरे, बोलशेट्टे मनीषा लिंगायत शिवा संघटना महिला जिल्हाध्यक्ष यांच्यासह 100 जणांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, वैद्यकीय शिक्षण मंत्री व लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख, युवक क्रीडा मंत्री सुनील केदार, आमदार धिरज देशमुख, आमदार राजेश राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, काँग्रेसचे सचिव अभय साळुंके यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
या प्रसंगी लातुर जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, सचिन दाताळ, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील , दयानंद चोपणे, आदी उपस्थित होते.