ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे..... सहाय्यक जिल्हाधिकारी जिथिन रेहमान.

 ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे.....

 सहाय्यक जिल्हाधिकारी  जिथिन रेहमान.  



निलंगा :-  ग्राहकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी शासनाने  " ग्राहक संरक्षण कायदा " अंमलात आणला असून ग्राहकाने कुठल्याही  आमिषाला बळी न पडता ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांबाबत जागरुक राहून दैनंदिन व्यवहार पूर्ण करावेत असे आवाहन  भारतीय प्रशासन सेवेतील  सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार जिथिन रेहमान  यांनी केले.   


निलंगा येथे तहसील कार्यालयाच्या वतीने गुरुवार दि. 17 मार्च रोजी आयोजित जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव  होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे , पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ , भुमी अभिलेख उपाधीक्षक अविनाश मिसाळ ,ग्राहक मंचाचे ॲड. नारायण सोमवंशी , सुधीर पुरी, विवेकानंद वाडीकर , गटविकास अधिकारी अमोल ताकभाते,नायब तहसीलदार अरुण महापुरे , रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील आदी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 पुढे बोलताना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार जिथिन रेहमान म्हणाले की , दैनंदिन व्यवहारात वावरत असताना प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो. प्रत्येक ग्राहकाला वस्तूच्या सुरक्षिततेचा हक्क जाणून घेण्याचा , वस्तूबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा, वस्तू निवडण्याबाबतचा, वस्तूबाबत  आपले म्हणणे मांडण्याचा , वस्तू बाबत तक्रार करण्याचा  व तक्रार निवारण करून घेण्याचा प्रत्येक ग्राहकाला हक्क असतो. म्हणून ग्राहकांनी त्यांना असलेल्या हक्कांबाबत व अधिकाराबाबत जागरूक राहून कार्य करावे असे ते म्हणाले. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी शोभा जाधव म्हणाल्या प्रत्येक व्यक्ती वस्तूंच्या आकर्षणास भुलतो ही मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे ग्राहकांनी विविध वस्तूंच्या जाहिरातबाजी व त्याबाबतच्या विविध सवलती यांना बळी न पडता वस्तूची खरेदी करावी. जगात काहीच फुकट मिळत नाही म्हणून ग्राहकाने ब्रँडच्या मागे न लागता वस्तूची आवश्यकता व गरज लक्षात घेऊन  खरेदी करावी.यावेळी बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिनेशकुमार कोल्हे म्हणाले की ग्राहक ही संकल्पना व्यापक आहे. ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्यास ग्राहकाने तातडीने संबंधित विभागाकडे व पोलीस खात्याच्या सायबर सेलकडे चोवीस तासांच्या आत तक्रार नोंदवावी असे आव्हान केले. याप्रसंगी ग्राहक मंचाचे ॲड. नारायण सोमवंशी,किशन मोरे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी केले. सूत्रसंचालन श्रीशैल बिराजदार यांनी केले तर आभार नायब तहसीलदार अरुण महापुरे यांनी मानले.

Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही