निलंग्यात शिवसेनेची "झाली तर आघाडी अन्यथा स्वतंत्र" लढण्याची तयारी...जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने

 *निलंग्यात शिवसेनेची "झाली तर आघाडी अन्यथा स्वतंत्र" लढण्याची तयारी...जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने



निलंगा : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असले तरी निलंगा शहरात सन्मानपूर्वक आघाडी झाली तर शिवसेना आघाडी मधून निवडणूक लढवेल अन्यथा शिवसेनेची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन आज निलंगा येथील नक्षत्र मंगल कार्यालयात आयोजित शिवसेनेच्या भव्य मेळाव्या प्रसंगी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी सांगितले.
आज निलंगा शहरात शिवसेना शहर शाखेच्या वतीने भवानी पेठ भागातून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली हुतात्मा स्मारक येथे आणण्यात आली तसेच शिवाजीनगर भागातील महिला व युवा सेना शिवसेनेच्या वतीने एक रॅली हुतात्मा स्मारकाकडे आणण्यात आली. हुतात्मा स्मारकापासून भव्य दिव्य अशी रॅली नक्षत्र मंगल कार्यालय कडे नेण्यात आली. या ठिकाणी सभागृहांमध्ये रॅलीचे रूपांतर मेळाव्यात करण्यात आले.
या मेळाव्याला मार्गदर्शन करत असताना जिल्हाप्रमुख माने म्हणाले, शिवसेनेची निलंगा शहरात मजबूत बांधणी झालेली असून यावेळेस जनतेची सेवा करण्यासाठी निलंगा नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. पालिकेतील मागच्या सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावावर शहराचा उकिरडा करून ठेवलेला आहे. शहरात रस्ते आहेत की खड्डे याचा तपास घेणे अवघड झाले आहे. शहरातील कोणत्याही मूलभूत सुविधा कडे लक्ष देण्यास पेक्षा सत्ताधाऱ्यांनी धार्मिक राजकारण केल्याचे जाणवते आहे. यापुढे असे होऊ द्यायचे नाही. शहराचा सर्वांगीण विकास करणारे नगरविकास खाते शिवसेनेकडे आहे आणि निलंग्याच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. शिवसेनेच्या ताब्यात नगरपालिका आल्यास या शहराचा चेहरामोहरा बदलला जाईल. यासाठी शिवसेनेचे खंबीर असे नगरसेवक या शहराची सेवा करण्यासाठी आपण पाठवावे. विकासासाठी कसलाच नाही कमी पडू दिला जाणार नाही असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, औसा विधानसभेतील बजरंग दादा जाधव, औसा तालुका प्रमुख सतीश शिंदे,निलंगा तालुका प्रमुख अविनाश रेशमे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी लातूरचे उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, सुनील बसपुरे, सतीश देशमुख, त्रंबक स्वामी, औसा चे शेखर चव्हाण, किशोर जाधव रोहित गोमदे,आबासाहेब पवार, संजय उजळंबे, शंकर लंगर, मुनीर खान पठाण, किशोर भोसले, सहदेव कोळपे, रवी भोसले, निलंगा चे प्रल्हाद गोपी, नंदू भाऊ लोंढे, शिवाजी साळुंखे, अण्णासाहेब मिरगाळे, महिला आघाडी रेखाताई पुजारी, दैवता सगर, व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख बसवराज मंगरुळे, मुरळी कर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, मुस्तफा शेख, शहर प्रमुख सुनील नाईकवाडे, हरीभाऊ सगरे, प्रशांत वांजरवाडे, दत्ता मोहोळकर, पृथ्वीराज निंबाळकर, राणा आर्य, प्रसाद मठपती" दाजीबा कांबळे,माधव नाईकवाडे, संतोष मोघे, अजिंक्य लोंढे, निखिल राजपूत, राहुल बिराजदार, उमेश सातपुते, गुंडू गाडीवान, बालाजी गाडीवान, आदींनी कार्यक्रमाच्या यशासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ सगरे यांनी केले. 
Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही