निलंगावासीयांना मिळणार चोवीस तास शुध्द पाणीपुरवठा पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे तब्बल 84 कोटींचा खर्च

निलंगावासीयांना मिळणार चोवीस तास शुध्द पाणीपुरवठा

पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे तब्बल 84 कोटींचा खर्च

निलंगा : निलंगावासीयांना जवळपास 40 हजार लोकसंख्या व ‘ क ‘ वर्ष नगरपालिका असलेल्या शहरासाठी परवडणारी योजना नसतानाही राजकीय प्राबल्याने मंजूर केलेल्या विशेष पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.त्यामुळे निलंगावासीयांना आता चोवीस तास शुध्द पाणी मिळत आहे.हे काम वेळेत व जलद गतीने पूर्ण केलेल्या ठेकेदाराचेही कौतुक होत आहे.
माजी मुख्यमंञी दिवंगत डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंजूर केलेल्या योजनेवर दुरूस्तीचा खर्च परवडणारा नव्हता,म्हणून माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत जवळपास 55 किलोमीटर अंतरावरून निलंगा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास नगरविकास विभागाने तीन वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती.नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व नागरिकांचा दर्जा वाढविण्याकरिता ही योजना आहे.जवळपास 84 कोटी रूपयांच्या या योजनेचे काम जलद गतीने काम सुरू करण्यात आले असून,यायोजनेत पाणीपुरवठा नविन विहीर,चार पाण्याचे जलकुंभ,नविन आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिल्टर,माकणी ते निलंगा 55 किलोमीटर लोखंडी सेन्सर युक्त पाईपलाईन शहरात 128 किलोमीटर अंतर्गत पाईपलाईनचा समावेश आहे.
शहरात 128 किलोमीटरची अंतर्गत पाईपलाईन पूर्ण झाली आहे.शिवाय,तीन जलकुंभाचे तीन झोन केले असून,एमआयडीसी येथे टाकी नंबर एक तयार आहे.उर्वरीत दोन टाक्या नगरपरिषदेच्या मागे व तिसरी टाकी उदगीर मोड येथे वीज केंद्राच्या जवळ आहे.शहरात अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून,घर तेथे नळजोडणी करण्यात आली आहे.केवळ पाचशे जोडणी देणे बाकी असून,सध्या पूर्ण क्षमतेने नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा सुरू आहे.
मराठवाड्यातील ‘ क ‘ वर्ग नगरपालिकेत मीटर बसवून चोवीस तास शुध्द पाणी देणारी एकमेव नगरपालिका ‘ निलंगा ‘ आहे.निम्नतेरणा प्रकल्पातील एप्रोच चॅनल,इंटेक वेल,इन्पेक्शन वेल,कनेक्टिंग मेन,जॅकवेल,आरसीसी अप्रोच पूल,हेड वर्क मिटर रूम,एप्रोच रोड,मेन जॅक वेल अशी डॅमवरील सर्व कामे पूर्ण झाली,त्यामुळेच ही योजना वेळेत पूर्ण झाली आहे.पूर्वी ज्या भागात अधिक दाबाने पाणी मिळत नव्हते.त्या ठिकाणीही आता प्रेशरने पाणी मिळत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून या कामावर देखरेख असून,अतिशय जलदगतीने हे काम झाले आहे.कामाची मुदत 24 महिने असली तरी मुदतीच्या आतच ही योजना पूर्ण झाल्याने ठेकेदाराचे कौतुक केले जात आहे.माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नाने निलंगा शहराला 24 तास पाणीपुरवठा होत आहे.

———————————————————————
” या योजनेतील काही भागात जे नळ जोडणी राहीले आहे.ते नागरिकांमुळे राहिले आहे. ‘ क ‘ वर्ग नगरपालिका दर्जात मराठवाड्यातील ही पहिलीच नगरपालिका आहे,जी मिटर बसवून नागरिकांना शुध्द दररोज पाणीपुरवठा देण्यात येणार असल्याने नागरिकांनी या शुध्द पाण्याचा वापर योग्य करावा व अपव्यय टाळावा “.
—सुंदर बोंदर ( मुख्याधिकारी नगरपालिका,निलंगा )
Popular posts
संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 14 जूनला उदगीरात आयटीआय प्रवेश मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image