साहित्य संमेलनात आरोग्याची सर्व यंत्रणा उभी करणार- जिल्हा शल्य चिकित्सक देशमुख
उदगीर--दि.२२ते २४एप्रिल2022 दरम्यान महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलन स्थळी आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा उभी करणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक एल. एस. देशमुख यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या टीमने शुक्रवारी येथील साहित्य संमेलन स्थळाच्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस. एस. देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता पवार,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश हरिदास,वैद्यकीय अधिकारी डॉ.एम. एम. अर्दाळे,वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.बी. स्वामी यांची उपस्थिती होती. संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर,संस्थेचे सचिव मनोहर पटवारी, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके कोषाध्यक्ष महादेव नौ बदेयांनी संमेलनाच्या तयारीची माहिती देवून आरोग्य विभागाच्या टीमचे स्वागत केले. संमेलन स्थळी आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा संमेलन स्थळी सज्ज राहणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देशमुख म्हणाले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा