जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची संमेलन कार्यालयास भेट

 जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची संमेलन कार्यालयास भेट 


उदगीर: येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात २२ ते २४ एप्रिल २०२२ रोजी होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयास जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना पिंगळे म्हणाले विद्यार्थ्यांनी ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या मन लावून केल्या पाहिजेत. प्रयत्नाला दिशा असणे अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम त्याची पूर्ण माहिती करून घ्या त्यानंतर नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास यश दूर नाही. यावेळी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सचिन मुंडे यांची जम्मू काश्मीर येथे सैन्य दलात भरती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंचावर कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर ,मुख्य कार्यवाह रामचंद्र तिरुके, संस्थेचे सचिव प्रा.मनोहर पटवारी सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे,कोषाध्यक्ष महादेव नौ बदे, नामदेवराव चामले,प्रभारीप्राचार्य डॉ. आर.आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्केयांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी केले

टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज