राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष

राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष 

--------------------------------------------------उदगीर : देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्याबद्दल उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

      यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिववंदना करण्यात आली. तसेच राज्यात ओबीसींना आरक्षण मिळाल्याबद्दल त्याचाही आनंदोत्सव भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन साजरा केला.

       यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, उत्तरा कलबुर्गे, सरोजा वारकरे, बापूराव यलमटे, रामचंद्र मुक्कावार, ऍड. दत्ताजी पाटील, ऍड. सावन पस्तापुरे, गणेश गायकवाड, अमोल निडवदे, साईनाथ चिमेगावे, रामेश्वर पवार, दिलीप मजगे, मोतीलाल डोईजोडे, अमोल अनकल्ले, लक्ष्मण फुलारी, अमीर शेख, आनंद बुंदे, मंगेश यरकुंडे, मधुमती कनशेट्टे, अनिता बिरादार, जया काबरा, मंदाकिनी जीवने, बबिता पांढरे, रमाबाई वाघमारे, वर्षा धावारे, मंगला काळा, श्रुती स्वामी, प्रतीक्षा गुंजाळे, स्नेहा गुंजाले, रेखा स्वामी, शिवानी ब्रह्मणा, अंकुश राठोड, संतोष बडगे, रवींद्र बेदरे, राहुल निटूरे, संजय पांढरे, आनद साबणे, प्रशांत रंगवाळ, महेश धावारे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर: ईश्वर समगे यांचा पुढाकार
Image
उदगीर येथील 51 व्यक्तींचे स्वॅब नमुने निगेटिव्ह
ऍड. दत्ताजी पाटील यांचा पुढाकार: आ. निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य : पालिका कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकारक शक्ती गोळ्यांचे वाटप: पालिकेकडे एक हजार बांबूची रोपे सुपूर्द
Image
जमहूर उर्दू शाळेत राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण  
Image