माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
ग्रामस्थांना धिर देवुन ; अभियंता व ठेकेदारास सूचना
उदगीर : तालुक्यातील चोंडी येथील साठवण तलावात पहिल्यांदाच जलसाठा होऊन तलावास गळती लागल्याची तक्रार या परिसरातील ग्रामस्थांनी केल्यामुळे माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी शनिवारी चॊंडी साठवण तलावास भेट देऊन पाहणी केली व येथील उपस्थित ग्रामस्थांना धीर देवून संबंधित अभियंता व ठेकेदारास सूचना केल्या.
या साठवण तलावास १४ वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ही रखडत राहिलेल्या चोंडी साठवण तलावास दोन वर्षांपूर्वी माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी सुधारित मान्यता घेऊन निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच आज या तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. दरम्यान, मुसळधार झालेल्या पावसामुळे तलाव ओसंडून भरल्याने तलावाच्या पाळूमधून पाण्याची गळती सुरू झाली होती. तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तलावाचा सांडवा फोडून पाणी दुस-या बाजुने काढून दिले. या परिसरात राहणाऱ्या काही ग्रामस्थांची या भागातील शाळेत राहण्याची व्यवस्था केली. या घटनेमुळे चोंडीतील ग्रामस्थ घाबरले होते. व त्यांना सदर साठवण तलाव फुटणार असल्याची भिती होती.
ही बाब माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांना कळताच त्यांनी विभागाचे अधीक्षक अभियंता ई. एम. चिस्ती, तहसीलदार रामेश्वर गोरे यांना सुचना केल्या व अधिकाऱ्यांनी चोंडी साठवण तलावास भेट देऊन पाहणी केली. चोंडी साठवण तलावाची गुणवत्ता दर्जेदार असून, आणखी दीड मीटर तलावाच्या पाळू भरावा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावु नये, असे आवाहन करून शिल्लक असलेले काम दर्जेदार करण्याच्या सूचना यावेळी आ.संजय बनसोडे यांनी अभियंता व ठेकेदारांना केल्या. दरम्यान, या साठवण तलावामुळे भयभीत झालेल्या चोंडीतील नागरिकांनी पुनर्वसनाची मागणी केली असता, त्यांना रमाई आवास योजनेतून घरे बांधून देण्याच्या सूचनाही माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी केल्या. दरम्यान आ.बनसोडे यांची भेट झाल्याने भयभीत झालेले ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडली. यावेळी त्यांना धिर देवून मी सदैव आपल्या सोबत असुन आपल्या आपण जे मागाल ती मदत मी करणार असल्याचे अभिवचन आ.संजय बनसोडे यांनी दिल्याने ग्रामस्थातुन समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्यासोबत तहसीलदार रामेश्वर गोरे, माजी सभापती प्रा. शिवाजी मुळे, बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रा. शाम डावळे, ताहेर हुसेन, कुणाला बागबंदे, पद्माकर उगिले, माजी सरपंच सतिश पाटील माणकीकर, वाढवणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सरपंच राजकुमार चिट्टे, संजीवकुमार चिट्टे, शिवराज हल्लाळे, दिगंबर कांबळे, लहु कांबळे, राजीव वाघे, आदी उपस्थित होते.
■
चोंडी साठवण तलावासाठी दहा कोटी रुपयाचा निधी मंजुर
तब्बल १४ वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर बंद पडलेल्या चोंडी साठवण तलावास माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी मतदार संघातील शेतक-यांच्या हितासाठी या भागातील जमिन सिंचनाखाली यावी म्हणून दोन वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता घेऊन १० कोटींचा निधी मंजूर करून दिला. त्यामुळे यावर्षी या तलावाचे काम पूर्ण होत आहे. पहिल्याच पावसात हा तलाव तुडुंब भरून ओसंडत असल्याचे पहावयास येते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा