उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम

उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम



उदगीर : येथील श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ ट्रस्ट उदगीर यांच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या 'रश्मीरथ' (शववाहिनी) चे माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री आ. बनसोडे यांनी कोरोना काळात श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाने स्तुत्य काम केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून श्री भोजनासारखा महत्वाचा उपक्रम अखंडपणे सुरू असल्याबद्दल कौतुक केले. शववाहिनी योग्य पद्धतीने हे मंडळ चालवू शकेल हा विश्वास असल्याने या मंडळाला ही शववाहिनी देण्याचा निर्णय घेतला. आमदारकीचा पहिला निधी अम्ब्युलन्ससाठी दिला त्यामुळे या भागातील गरजू रुग्णाला लाभ झाला. मंत्रिपदाच्या काळात मास्टर प्लॅन करून उदगीर मतदारसंघातील विकासाची कामे पूर्ण केली असल्याचे यावेळी आ. बनसोडे म्हणाले. आगामी गणेशोत्सव उत्साहात साजरी करण्याचे आवाहन करून आ. बनसोडे यांनी या महोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे, रिलेबर ऍग्रो फुड पूर्णाचे शाहिद हुसेन, रोटरी क्लबचे अध्यक्ष रामेश्वर निटूरे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजी मुळे, ऍड. दत्ताजी पाटील, प्रा. श्याम डावळे, ताहेर हुसेन, मंडळाचे अध्यक्ष आशिष अंबरखाने, उपाध्यक्ष विजय निटूरे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विश्वजित पाटील यांनी केले. आभार संतोष अनकल्ले यांनी मानले.
या कार्यक्रमास मोतीलाल डोईजोडे, नाथा कोटलवार, उमाकांत वडजे, चंद्रकांत गुडमेवार, लाला कल्याणी, मारोती कोटलवार, विजय पारसेवार, अहमद सरवर, विशाल जैन, शैलेश कस्तुरे, उमाकांत सुंदाळे, जय स्वामी, अजित शिंदे, कपिल शेटकार, संतोष अनकल्ले, अमोल अनकल्ले, गजानन नागठाणे, संदीप बिरादार, ओम गांजुरे, नागेश अंबेगावे, शिवकुमार उप्परबावडे, अक्षय जाधव, कैलास मोदी, अभय पारसेवार, नागेश अष्टरे, गणेश बिरादार, चेतन कप्पिकेरे, केदार पेन्सलवार, नरेश सोनवणे, आदींची उपस्थिती होती.