केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी




केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

उदगीर : राज्यातील केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात उदगीर येथील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उदगीर येथे रस्त्यावर येऊन गुरुवारी आंदोलन केले. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आंदोलनकर्त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचे रूपांतर एका सभेत करण्यात आले.

      अच्छे दिन चे स्वप्न दाखवून केंद्रातील मोदी सरकार सत्तेवर आले असून सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारला पायउतार करण्याचे आवाहन यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. भाजप सरकारच्या काळात भारतीय संविधान धोक्यात आले असून  हुकूमशाही येण्याची शक्यता असल्याचे सांगत लोकशाही धोक्यात आणण्याचे काम भाजपकडून चालू असून ही लोकशाही वाचविण्यासाठी जनतेनी पुढे येण्याचे आवाहनही यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. उदगीरच्या लोकप्रतिनिधी बद्दल बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जातीवादी लोकांच्या विरोधात लढत शरद पवार यांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही येथील आमदारांना निवडुन दिले मात्र जातीवादी लोकांसोबत जाऊन आमच्या आमदारांनी जनतेशी बेईमानी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी हा मोर्चा काढला होता. यावेळी माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी, शिवराज तोंडचिरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी मुळे, मधुकर एकुरकेकर, माजी नगराध्यक्षा उषा कांबळे, आपचे रंगा राचुरे, उपसभापती प्रीती भोसले, प्रभाकर काळे, चंदन पाटील नागराळकर, अजीम दायमी, गजानन सताळकर, सरोजा बिरादार, शिवाजी देवनाळे, अंकुश कोनाळे, चंद्रकांत टेंगेटोल, श्रीमंत सोनाळे, मन्मथ किडे, नाना ढगे, शंकर मुक्कावार, शीला पाटील, आदर्श पिंपरे, प्रमोद पाटील,बालिका मुळे, प्रेम तोगरे, ईश्वर समगे, मंजूर पठाण, मारोती पांडे,श्रीनिवास एकूरकेकर, धनाजी बनसोडे, चारुशीला पाटील, अरुणा लेंडाणे ओमप्रकाश पाटील, धनाजी बनसोडे, फेरोज देशमुख, प्रा. गोविंद भालेराव, सोपानराव ढगे, ऍड. वर्षा बनसोडे, क्रांती नळगिरकर, प्रमिला सताळकर यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, शेतकरी बांधव उपस्थित होते.

 


टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज