*जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*

 *जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*




लातूर : जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाने आयोजित केलेल्या वन सफरीत सहभागी होत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे फुलांच्या, पक्षांच्या सान्निध्यात रमून गेल्या. यावेळी त्यांनी तीन तास वन सफर करीत साखरा उद्यानातील वृक्ष, पक्षी यांची माहिती जाणून घेतली.


सहायक वनसंरक्षक वृषाली तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे, वनपरीमंडळ अधिकारी निलेश बिराजदार, जैवविविधता समिती सदस्य शहाजी पवार, पक्षीमित्र राहुल जवळगे यावेळी उपस्थित होते.


लातूर जिल्ह्यातील या जैवविविधतेचे जतन संवर्धन करण्याबाबत त्यांनी वनाधिकारी व जैवविविधता समिती सदस्यांशी जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी मनमोकळा संवाद साधला. सर्वसाधारणपणे पक्षी व वन्यजीवांच्या निरीक्षणासाठी सूर्योदयाची वेळ योग्य असते, हे जाणून जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे ह्या सकाळीच साखरा उद्यानात दाखल झाल्या. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.  साखरा व अंकोली येथील वनक्षेत्राची जिल्हाधिकारी यांनी पहाणी केली. माळरानावरील जैवविविधता, विविध वन्यप्राण्यांच्या पावलांचे ठसे त्यांनी पहिले. 


वन्यजीवांसाठी तयार करण्यात आलेले कृत्रीम पाणवठे, तसेच शिकारी पक्षाच्या प्रजातीबाबत माहिती त्यांनी जाणून घेतली. वनपरीक्षेत्रात लावण्यात आलेली झाडे उन्हाळ्यातही जगावीत यासाठी त्यांनी पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. यासाठी लोकसहभाग वाढवण्यातबाबत पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. साखरा येथील बटर फ्लाय गार्डन तसेच घनवनात असलेले विविध पक्षी व फुलझाडे यांची पाहणी केली. जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्ती जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

******

टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज